Arjun Bijlani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Bijlani: लग्नाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला घटस्फोट? स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

Arjun Bijlani: टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी त्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. काही चाहत्यांना असे वाटत होते की तो त्याची पत्नी नेहा स्वामीपासून वेगळे होत आहे. आता अर्जुनने एक व्हिडिओ पोस्ट करुन त्याचे मत व्यक्त केले आहे.

Shruti Vilas Kadam

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी त्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. काही चाहत्यांना असे वाटत होते की तो सलमान खानच्या 'बिग बॉस १९' घरात प्रवेश करत आहे, तर काहींना असे वाटत होते की तो त्याची पत्नी नेहा स्वामीपासून वेगळे होत आहे. आता अर्जुनने एक व्हिडिओ पोस्ट करुन त्याचे मत व्यक्त केले आहे.

काही काळापूर्वी अर्जुन बिजलानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो नेहाकडे प्रेमाने बघताना दिसत होता. त्यानंतर तो तिला मिठी मारतो आणि किस करतो. दोघे एकमेकांच्या मिठीत नाचताना दिसले होते आणि व्हिडिओमध्ये अर्जुन नेहाला गुलाब देतानाही दिसला होता. अर्जुनने त्याच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केले की ते घटस्फोट घेत नाहीत किंवा बिग बॉस १९ मध्ये प्रवेश करत नाहीत.

अर्जुन बिजलानी घटस्फोट घेणार की नाही?

अर्जुनच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, 'मागच्या व्हिडिओमुळे कोणताही अंदाज लावू नका मी माझं मत व्यक्त केल होतं मी हे स्पष्ट करतो की मी बीबी करत नाही आणि घटस्फोट घेत नाही...

अर्जुन बिजलानी 'बिग बॉस १९' मध्ये जाणार नाही

अर्जुन बिजलानी सलमान खानच्या शो बिग बॉस १९ मध्ये सहभागी होत असल्याच्या अफवांसह, नेहाशी त्याच्या घटस्फोटाच्या अटकळी त्याने एक व्हिडिओ शेअर केल्यापासून सुरु झाल्या होत्या त्याने सांगितले की त्याची पत्नी आणि मुलगा त्याच्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमीच त्याच्यासोबत राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी

Mumbai : लोकलमध्ये दरवाजा उघडा ठेवण्यावरून वाद, २१ वर्षीय तरुणाची हत्या; मोठी अपडेट समोर

Sleep requirements by age: तुमचं वय किती आहे? जाणून घ्या तुम्ही दर दिवशी किती झोप घेतली पाहिजे?

Political News: केंद्रीय मंत्र्यांची प्रकृती बिघडली, तातडीने एम्स रुग्णालयात केलं दाखल

Monsoon Session 2026 : मोदी-शाह आले अन् संसद स्थगित, 19 दिवस संसद मात्र कामकाज शून्य

SCROLL FOR NEXT