Arijit Singh Injured Saam tv
मनोरंजन बातम्या

Arijit Singh Injured: कलाकारांशी सांभाळून वागा नाहीतर... लाईव्ह कॉन्सर्टमधील अरिजित सिंगच्या अपघातानंतर उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

Arijit Singh Got Injured In Live Concert: एक कॉन्सर्ट दरम्यान अरिजित सिंगच्या चाहत्याने त्याचा हात खेचला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.

Pooja Dange

Utkarsh Shinde Post For Arijit Singh: गायक अरिजित सिंगचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एक कॉन्सर्ट दरम्यान त्याच्या चाहत्याने त्याचा हात खेचला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तो कॉर्नस्ट थांबवावा लागला. यावेळी तो चाहत्यांशी साधत असलेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

तर गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने हा सगळ्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. (Latest Entertainment News)

उत्कर्ष शिंदेने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, 'छत्रपती संभाजी नगरमध्ये (औरंगाबाद) शो चालू असताना अरिजित सिंगच्या चाह्त्याने हात ओढला. काल मी अरिजित सिंगच्या लाइव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली होती. हजारो चाहते त्याच्या गाण्याचा आनंद घेत होते. ज्या हाताने तो गिटार वाजवत होता तो हात एका महिला फॅनने. त्यामुळे त्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला ना गिटार वाजवता आला ना तो चाहत्यांशी हात मिळवू शकला. (Latest Entertainment News)

चाहत्यांनी समजून घेतले पाहिजे की आम्ही कलाकार तुमच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही जे काही आहोत ते तुमच्या प्रेमामुळे आहोत. पण बरेचदा तुम्हाला देखील समजले पाहिजे, काही परिपक्वता (मॅच्युरिटी), काही सन्मान, काही चाहत्यांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून असे अपघात होणार नाहीत. कधी कधी मद्यधुंद चाहते येतात असेच असभ्य वागतात आणि न संपणारे असंख्य सेल्फी मागतात, बरेचदा काही चाहते हे विसरतात की कलाकाराला तूमच प्रेम हवे ना की त्रास.'

अरिजितने देखील त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचे मत व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये त्याने हाताला पट्टी देखील बांधली आहे. त्याने पोस्ट करत म्हटले आहे की, एक कलाकार त्याच्या प्रत्येक चाहत्यासाठी नॉन-स्टॉप 4 तास त्यांच्या उत्कटतेने आणि मनापासून परफॉर्म करतो... कृपया संगीताचा आनंद घ्या आणि ते ऐकण्याचा आनंद घ्या... पण जरा समजुतीने वागा. कालच्या मैफिलीत घडलेले हे दृश्य अक्षरशः हृदयद्रावक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT