Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "त्याने जे केलं ते चुकीचं..." निक्कीच्या आईच्या 'त्या' वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी 5 चा शेवटचा टप्पा सुरू आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक स्पेशल टास्क सुरू आहे. अशातच बिग बॉसच्या घरात निक्कीची आईची एन्ट्री झाली आहे. यादरम्यानचा प्रोमो रिलीज झाला आहे. आता आजच्या भागात नक्की काय होणार आहे याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.

निक्कीच्या आईने बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच धक्कादायक खुलासा केला आहे. निक्कीची आई म्हणाली , की अरबाजचा साखरपुडा झाला आहे. त्याने जे केलं ते बरोबर नाही. यानंतर निक्की चिडते. आणि बिग बॉसच्या घरात निक्कीचं जे होतं ते आता संपलं आहे. असे म्हणते. निक्कीची आई तिला समजवाताना बिग बॉसच्या घरात दिसत आहे. यावर आता अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.

अरबाजने, मी आता कलर्स टीव्हीवर बिग बॉसचा लेटेस्ट प्रोमो बघितला. बिग बॉसच्या घरात निक्कीची आई आल्या आहेत. त्या म्हणाल्या की सर्वत्र अरबाजचा साखरपुडा झाला असल्याचं बोलत आहे. हे सर्व खोटं आहे. या सर्व अफवा सुरू आहेत. मात्र असं काहीही नाही. माझा साखरपुडा झालेला नाही. लग्नही झालेलं नाही. निक्कीला काहीही माहित नसल्याने ती देखील रिअॅक्ट झाली आहे. पण नंतर आम्ही भेटलो तर मी तिला सगळं सांगेन. तिने हे सगळं समजून घेतलं तर चांगलंच आहे. नाहीतर काही हरकत नाही. अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजची मैत्री तुम्हाला सर्वांना चांगलीच ठाऊक आहे. अनेकदा खटके उडवूनही हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसते. अरबाजला निक्की कोणाशी बोल्लेली आवडत नव्हती निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवरून अरबाजने निक्कीशी जोरदार भांडण केले होते. त्याने बिग बॉसच्या घरातील भांडणी फोडली होती. दरम्यान बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात अरबाजला कमी मत मिळाल्याने त्याने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. यावेळी देखील निक्की भावूक झालेली दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पोलिसांना पाहून घाबरला, थेट दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; नेमकं काय घडलं? वाचा...

Salt Effect On Health: आहारात मीठाचं सेवन जास्त प्रमाणात करताय? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Indian Port Workers Salary : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ; पगार किती टक्क्यांनी वाढणार? वाचा

Bribe Case : शाळेतील शिपायाकडून १० हजाराची मागणी; मुख्याध्यापक एसीबीच्या ताब्यात

Hasan Mushrif : 'मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण ..' ; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT