Arbaaz Patel SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arbaaz Patel : अरबाज म्हणतोय निक्की माझा कम्फर्टझोन, गर्लफ्रेंडसोबतच्या नात्यावर मौन सोडलं

Arbaz Patel Relationship : अरबाज घराबाहेर आल्यावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलास केले आहेत. अरबाज पटेल काय बोलला जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉस मराठीचे 5 (Bigg Boss Marathi 5 ) वे पर्व सध्या खूप गाजत आहे. सर्वत्र या पर्वाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात दोन सदस्या घराबाहेर गेले. संग्राम चौगुले हाताला झालेल्या दुखापतीमुळे घराबाहेर गेला. तर अरबाजला (Arbaaz Patel) कमी मते मिळाल्यामुळे तो घरा बाहेर गेला. अरबाजला बिग बॉसचे घर सोडावे लागल्याचे निक्कीला खूप दुःख झालेले पाहायला मिळाले. ती अरबाज जाताना खूप रडताना दिसते.

बिग बॉस घरात अरबाज-निक्कीची जोडी नेहमी चर्चेत होती. कधी त्यांच्या नात्यावरून तर कधी त्याच्या खेळामुळे चर्चेत असायचे. अरबाजने घरी असतानाच तो रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तो लीझा बिंद्राबरोबर (Lleeza Bindra) कमिटेड असल्याचे बोला होता. अरबाज बिग बॉस घरात असताना लीझाने अनेक पोस्ट सोशल मीडियावर केल्या होत्या. तर निक्कीने अरबाज सोबतची मैत्री कायम ठेवायला आवडेल असे सांगितले होते. आता बिग बॉस घराबाहेर आल्यावर अरबाज आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगचाल चर्चेत आला आहे. प्रत्येक मुलाखतीत त्याला त्याच्या आणि निक्कीच्या नात्यावरून प्रश्न विचारले जात आहेत. तसेच त्यांच्या गर्लफ्रेंड वरूनही त्याला अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

अरबाजला एका मिडिया मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर विचारण्यात आले. या मुलाखतीत अरबाजच्या गर्लफ्रेंड विषयी विचारण्यात आले की, तुम्ही दोघ लग्न करणार आहात का? तुमच्या नात्याबद्दल काय सांगशील. यावर अरबाजने उत्तर दिले की, "मी या ठिकाणी येण्याआधीच मला आई-वडिलांनी सांगितले तुझ्या वैयक्तिक गोष्टी तशाच ठेव त्या कोणालाही सांगायचे आता गरज नाही. त्यामुळे मी त्याच्या या बोलण्याचा आदर करतो. त्यामुळे मी माझ्या पर्सनल गोष्टी सांगू शकत नाही. कारण जेव्हा मी आत होतो तेव्हा बाहेर काय झाले हे मला माहित नाही" त्यानंतर त्याला लीझाने केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टवर देखील त्याला विचारण्यात आले, "तेव्हा तो म्हणाला की, मला नाही काही माहित की अशा पोस्ट शेअर झाल्या आहेत ते. तुम्ही मला गेम बद्दल विचारा मी सर्व सांगेन पण माझ्या पाठीमागे काय झालंय त्याबद्दल काय सांगू शकत नाही." असे अरबाज म्हणाला.

या मुलाखतीत निक्की (Nikki Tamboli) संबंधित विचारल्यावर अरबाजने सांगितले की, बिग बॉसच्या घरात मी निक्कीसोबत जोडलो गेलो कारण निक्की माझा कम्फर्ट झोन होती. ती मला एखाद्या बाळासारखी ट्रीट करायची त्यामुळे मी तिच्याशी जोडला गेलो. असे अरबाज निक्की बद्दल बोलला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT