Arbaaz Khan Baby Photo SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arbaaz Khan Baby Photo : अरबाज-शूराने दाखवली लाडक्या लेकीची पहिली झलक, एकदा फोटो बघाच

Arbaaz Khan-Sshura Khan Baby Photos : अरबाज खानने आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक दाखवली आहे. बाळाचे खास फोटो शेअर केले आहेत.

Shreya Maskar

अरबाज खान आणि शूरा खानला मुलगी झाली.

5 ऑक्टोबरला शूराने बाळाला जन्म दिला.

एका महिन्याने अरबाज खानने लाडक्या लेकीची पहिली झलक दाखवली आहे.

परिणीती चोप्रानंतर बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) देखील आपल्या गोंडस मुलीची झलक दाखवली आहे. 8 ऑक्टोबरला अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खानने (Sshura Khan) मुली झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. आता एका महिन्यानंतर अरबाज-शूराने लेकीची पहिली झलक दाखवली आहे. अरबाज खानच्या लेकीचे नाव सिपारा खान (Sipaara Khan) असे आहे.

अरबाज आणि शूराने एक सोशल मीडियापोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी दोन फोटो शेअर केले आहे. यात बाळाचे चिमुकले हात आणि पाय पाहायला मिळत आहेत. पहिल्या फोटोत अरबाज आणि शूराने मुलीचा छोटासा हात पकडला आहे. तर दुसऱ्या फोटोत लेकीने वडिलांचा अंगठा पकडलेला आहे. पोस्टला जोडप्याने हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "इवलेसे हात-पाय आमच्या हृदयाचा सर्वात मोठा भाग..."

शूराने 5 ऑक्टोबर मुलीला जन्म दिला. अरबाज आणि शूराच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव करत आहेत. अरबाज-शूराच्या बाळाला पाहायला संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात गेले होते. वयाच्या 58 वर्षी अरबाज खान पुन्हा एकदा बाबा झाला आहे. शूरा खान ही अरबाजची दुसरी पत्नी आहे.

अरबाज-शूरा लग्नगाठ

अरबाज खानचे पहिले लग्न मलायका अरोरा 1998 मध्ये झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या 18 वर्षांनी दोघे वेगळे झाले. त्यानंतर 2023 मध्ये अरबाज खानने शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. आता दोन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत. अरबाज आणि शूराचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav Kapur News: ७ वर्षाने लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गौरव, कोण आहे ही तरूणी?

Shubh Shravani: झी मराठीवर लवकरच येणार नवी मालिका; 'हा' अभिनेता ९ वर्षांनी करणार कमबॅक

Mahayuti politics : महापालिका निवडणुकीसाठी 4 + 4 सूत्र, महायुतीचा नेमका प्लान काय?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

BMC Housing Lottery: मुंबई महापालिकेच्या ४२६ घरांसाठी सोडत निघणार; या दिवशी लागणार लॉटरी

SCROLL FOR NEXT