Arbaaz Khan Wife Sshura Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaaz Khan: ५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता होणार बाबा! पत्नीच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी सांगताना म्हणाला, 'दुसऱ्यांदा वडील होणे...'

Arbaaz Khan: बॉलीवूडचा अभिनेता व निर्माता अरबाज खान पुन्हा वडील होणार आहेत, अशी माहिती त्यांने आजच प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत दिली.

Shruti Vilas Kadam

Arbaaz Khan : बॉलीवूडचा अभिनेता व निर्माता अरबाज खान पुन्हा वडील होणार आहेत, अशी माहिती त्यांने आजच प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत दिली. ५७ वर्षीय अरबाज आणि त्याची पत्नी, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शूरा खान लवकरच आई-बाबा होणार आहेत. या मुलाखतीतून अरबाजने आपला आनंद व्यक्त केला.

अरबाजने एका मुलाखतीत सांगितले की, "२५ वर्षांनंतर पुन्हा वडील होण्याची प्रक्रिया खरंच रोमांचक आहे. भीती, उत्साह, आणि जबाबदारी अशा एकत्र भावना आहेत. मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मी आणि शूरा खूप खूश असून आम्ही हा वेळ एन्जॉय करत आहोत." अरबाज खानने असेही म्हटले की, बऱ्याच काळानंतर दुसऱ्यांदा वडील होणे ही एक नवीन भावना आहे."

अरबाज-कुटुंबाने २४ डिसेंबर, २०२३ रोजी लग्न केले, या लग्नात त्याच्या जवळचा मित्रपरिवार तसेच फिल्म इंडस्ट्रीतील सहकारी उपस्थित होते. अरबाजचे पहिले लग्न अभिनेत्री मालाइका अरोराशी केले होते आणि त्यांना अरहान नावाचा एक मुलगा आहे, ज्याचा जन्म २००२ मध्ये झाला होता.

शूरा आणि अरबाजचे लग्न २०२३ मध्ये झाले

अरबाज खान आणि शूरा खान यांचे लग्न २०२३ मध्ये झाले. शूरापूर्वी अरबाज खानचे लग्न मलायका अरोराशी झाले होते. अरबाज आणि मलायका यांचे लग्न १९९८ मध्ये झाले. २० वर्षे एकत्र राहिल्यानंतर, २०१७ मध्ये दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परशुराम घाटा गॅबियन वॉलला तडे, दरड कोसळण्याची भीती

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

SCROLL FOR NEXT