Arbaz Patel  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaz Patel Girlfriend Post: अरबाज पटेल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच गर्लफ्रेंड लिझाची पहिली पोस्ट, म्हणाली 'जेव्हा मी...'

Arbaz Patel Girlfriend Post: अरबाज घराबाहेर गेल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अरबाजची गर्लफ्रेंड लिझाने पोस्ट शेअर केली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये आठव्या आठवड्यात अरबाज पटेलने एक्झिट घेतली आहे. घरात नॉमिनेट असलेल्या सदस्यांची वोटिंग कमी मिळाल्याने अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. अरबाज घराबाहेर गेल्याने सर्वच स्पर्धकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अरबाजच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

बिग बॉसच्या घरात काल रविवारी भाऊच्या धक्क्यावर नाही तर बिग बॉसच्या घरात एलिमेशन टास्क पार पडलं. यामध्ये बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेलला कमी मत मिळाल्याने बाहेर जावं लागलं आहे. बिग बॉसच्या घरात अरबाज पटेल एलिमेट झाला. दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना स्वत: अरबाज नाराज दिसला.

नुकतंच सोशल मीडियावर अरबाजने इमोशनल पोस्ट केली आहे. निक्कीसोबतचे भावनिक फोटो शेअर केले आहेत. अरबाज बाहेर पडताच निक्कीला मोठा धक्का बसला. निक्कीने, "आता मी कोणाशी बोलू, नको ना जाऊ" असं म्हणत थेट बिग बॉसला विनंती केली.

अरबाजच्या एक्झिटनंतर सोशल मीडियावर अरबाजची गर्लफ्रेंड लिझाने पोस्ट शेअर केली आहे. ती सध्या चर्चेत आहे. लिझाने इन्स्टाग्रावर अपडेट दिली आहे. स्टोरी पोस्टमध्ये, जेव्हा मी दु:खी असते तेव्हा मी काय करते असं सांगितलं आहे. यावर पुढे तिने, उत्तर देत नमाज पठण करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अरबाजने बिग बॉसच्या घरात तो कमिटेंड असल्याचं स्पष्ट केले होतं. सोशल मीडियावर हे दोघे एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. मात्र बिग बॉसमधील निक्की आणि अरबाजची जवळीक वाढताना नेटकऱ्यांनी गर्लफ्रेंडला लिझाला थेट प्रश्न विचारले होते. यावर लिझाने अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता अरबाजच्या एक्झिटनंतर पु्न्हा निक्की भावूक झालेली पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

SCROLL FOR NEXT