A. R. Rahman Net Worth: 'द मोझार्ट ऑफ मद्रास' म्हणून प्रसिद्ध असलेला ए. आर. रहमान आज ५६ वर्षांचा झाला आहे. अल्लाहक्का रहमान असे त्याचे पूर्ण नाव असून रहमान अनेकांसाठी प्रेरणास्थान झाला आहे. रहमान त्याच्या आवाजासाठी खास ओळखला जातो. तथापि, ऑस्कर विजेता ए. आर. रहमानबद्दल असे बरेच मुद्दे आहेत त्याच्या चाहत्यांना माहित नाहीत. चला तर जाणून घेऊया त्याच्या वाढदिवसानिमित्त काही माहिती...
रहमानचा जन्म एका हिंदू कुटुंबात दिलीप कुमार म्हणून झाला होता. वयाच्या 23 व्या वर्षात संगीतकाराने त्याचे आध्यात्मिक गुरू, कादरी इस्लाम यांची भेट घेत इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
संगीत क्षेत्रात येण्यापूर्वी, ए.आर. रहमान दूरदर्शनच्या वंडर बलूनमध्ये लहान मुलाच्या रूपात दिसला होता, ज्यामध्ये त्याने एकाच वेळी 4 कीबोर्ड वाजवणाऱ्या लहान मुलाच्या रूपात लोकप्रियता मिळवली होती. 1991 मध्ये, रहमानने स्वतःचा संगीत बँड तयार करत देशाच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त वंदे मातरम प्रदर्शित करत प्रसिद्धी मिळवली.
1992 मध्ये, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मणिरत्नम हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी ए. आर. रहमानला पाहिली संधी देत 1992 मध्ये 'रोजा' या तमिळ चित्रपटासाठी संगीत दिले. त्यात संगीत दिल्याबद्दल रहमानला 25,000 रुपये मानधन मिळाले होते. अनेक गाण्यांसाठी रहमानला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
काही मिनिटांच्या कार्यक्रमासाठी रहमान करोडो रुपये आकारतो. त्याच्या कार्यक्रमासाठी चाहत्यांचीही बरीच गर्दी असते.
रहमानने 1995 मध्ये सायरा बानोशी लग्न केले. रहमानला दोन मुलं आणि एक मुलगी असा छोटा परिवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.