AR Rahman Saam Tv
मनोरंजन बातम्या

A.R. Rahman: ए.आर. रहमान यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा; चोरीचा आरोप फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

A.R. Rahman Case: "पोन्नियिन सेल्वन २" चित्रपटातील "वीरा राजा वीरा" या गाण्याशी संबंधित कॉपीराइट प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने संगीतकार ए.आर. रहमान यांना दिलासा दिला आहे.

Shruti Vilas Kadam

A.R. Rahman Case: "पोन्नियिन सेल्वन २" चित्रपटातील "वीरा राजा वीरा" या गाण्याशी संबंधित कॉपीराइट प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने संगीतकार ए.आर. रहमान यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने रहमान आणि चित्रपट निर्मात्यांना गाण्याचे श्रेय बदलण्याचे आणि २ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश देणारा एकल न्यायाधीशाचा आदेश रद्द केला.

कॉपीराइट उल्लंघन खटला

पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय शास्त्रीय गायक फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी एकल न्यायाधीशासमोर कॉपीराइट उल्लंघन खटला दाखल केला होता, त्यामध्ये आरोप करण्यात आला होता की हे गाणे त्यांचे वडील नासिर फैयाजुद्दीन डागर आणि काका झहीरुद्दीन डागर यांनी रचलेल्या शिव स्तुती गाण्यावरून कॉपी केले आहे.

ए.आर. रहमान यांनी या निर्णयाला आव्हान दिले

यापूर्वी, एकलपीठाने रहमान आणि चित्रपटाचे निर्माते, मद्रास टॉकीज आणि लायका प्रॉडक्शन्स यांना या गाण्यासाठी न्यायालयात २ कोटी रुपये जमा करण्याचे आणि गाण्याच्या श्रेयांमध्ये दिवंगत संगीतकार नासिर फय्याजुद्दीन डागर आणि नासिर जहिरुद्दीन डागर यांची नावे समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते.

रहमान यांनी या निर्णयाला आव्हान दिले होते. आता,न्यायमूर्ती सी. हरि शंकर आणि ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने एकलपीठाचा आदेश रद्द केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की वादग्रस्त आदेश लागू केला जाणार नाही. न्यायालयाने म्हटले की एकलपीठाचा आदेश आदेश तत्वतः रद्द करण्यात यावा. कारण या निर्णयात एकलपीठाने कॉपीराइट उल्लंघनाच्या पैलूवर कोणतेही मत व्यक्त केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT