Shivani Naik  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shivani Naik : लगीन घटिका समीप आली! 'अप्पी' बांधणार लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्नगाठ, पाहा साखरपुड्याचे PHOTOS

Shivani Naik Engagement : 'अप्पी आमची कलेक्टर'मधील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईकचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्नगाठ बांधणार आहे.

Shreya Maskar

'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्री शिवानी नाईक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

नुकताच शिवानी नाईकने प्रसिद्ध अभिनेत्याशी साखरपुडा केला आहे.

'अप्पी'च्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांची लाडकी 'अप्पी' लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच 'अप्पी'चा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' मधील मुख्य अभिनेत्री शिवानी नाईकने (Shivani Naik) लोकप्रिय अभिनेत्याशी साखरपुडा केला आहे. 'अप्पी'च्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साखरपुड्याचा लूक

शिवानी आणि अमितने साखरपुड्याला दोन लूक केले होते. साखरपुड्याच्या विधीसाठी शिवानीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर अमितने यावेळी ऑफ व्हाइट रंगाचा सदरा घातला होता. दोघेही पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. एकमेकांच्या बोटात अंगठी घालताना दोघांनी वेगळा लूक केला होता. 'अप्पी' ने जांभळ्या रंगाची सुंदर नक्षी असलेली साडी नेसली होती. तर अमितने फ्लोअर प्रिंट जॅकेट आणि सदरा परिधान केला होता. त्यांचा साखरपुडा 26 ऑक्टोबरला पार पडला.

'अप्पी'चा होणारा नवरा कोण?

शिवानी नाईकचा नवरा प्रसिद्ध अभिनेता अमित रेखी आहे. अमितने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून अमितला खूप लोकप्रियता मिळाली. तसेच त्याने आई आणि बाबा रिटायर होत आहेत, पिंगा गं पोरी पिंगा या मालिकांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. शिवानी आणि अमित दोघेही अभिनय क्षेत्राशी जोडलेले आहेत.

साखरपुड्याला शिवानी आणि अमितचे मित्र मंडळी आणि कुटुंब पाहायला मिळाल्या. त्यांच्या नवीन प्रवासासाठी चाहते आणि कलाकार शुभेच्छा देताना दिसत आहेत. चाहते आता दोघांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Eating Tips : सावधान! टोमॅटो खाताना 'ही' एक चूक करणं पडेल महागात

Mumbai To Toranmal: महाराष्ट्रातील दुसरे थंड हवेचे ठिकाण, मुंबईहून तोरणमाळला कसे जायचे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग

महिला डॉक्टरला न्याय न मिळाल्यास ८३ वर्षांचे माजी आमदार काठीच्या आधारावर बीड ते फलटण पायी जाणार|VIDEO

Satara Picnic Spot: हिवाळ्यात पार्टनरसोबत फिरायला जायचंय? या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

EDLI News: नोकरदारांच्या कामाची बातमी ! 'या' कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना EPFO देणार ₹७ लाख; नेमकी स्कीम आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT