Anushka Sharma SAAM TV
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma : अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? विराटसोबत मुंबईत स्पॉट, 'त्या' VIDEO नंतर जोरदार चर्चा सुरू

Anushka Sharma Pregnant? : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या एका व्हिडीओमुळे अनुष्का प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेटकरी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनुष्का-विराट मुंबईत स्पॉट

अनुष्का तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा

अनुष्का-विराटचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बॉलिवूडचे पावर कपल अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे. अलिकेडच दोघे मुंबईत स्पॉट झाले. त्यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

अनुष्का शर्मा गरोदर आहे का?

अनुष्का आणि विराट मुंबईतील वरळी येथील अमेरिकन भक्ती-संगीत गायक कृष्णा दास यांच्या 'लाईव्ह कीर्तन' कार्यक्रमाला उपस्थित होते. या आध्यात्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी, त्यांना 'गेटवे ऑफ इंडिया' येथेही पाहण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये अनुष्का टाळ्या वाजवताना आणि भक्ती-गीतांमध्ये सहभागी होऊन गाताना दिसत आहे, तर विराट तिच्या शेजारी बसलेला आहे.

अनुष्काने कार्यक्रमासाठी अनारकली सूट परिधान केला होता. ज्यावर सुंदर ओढणी तिने घेतली होती. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनुष्काच्या ड्रेसमुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडींओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने विचारले, "अनुष्का पुन्हा गरोदर आहे का?" दुसऱ्या एका युजरने लिहिले, "केवळ मलाच असे वाटतेय का की अनुष्का शर्मा गरोदर आहे?" दरम्यान, एका युजरने गमतीने म्हटले, "अनुष्कालाही कदाचित ट्विटरवरूनच कळत असेल की ती गरोदर आहे!"

एकंदर व्हायरल व्हिडीओमुळे अनुष्का तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र अद्याप याबाबत विराट-अनुष्काने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली डिसेंबर २०१७ मध्ये लग्नबंधनात अडकले. २०२१ मध्ये 'वामिका' नावाची मुलगी झाली, तर २०२४ मध्ये 'अकाय' नावाच्या मुलाचा जन्म झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : स्वराज्याच्या स्वप्नाचा जन्म जिथे झाला, 'तो' ऐतिहासिक किल्ला प्रत्येक मराठी माणसाने एकदा नक्की पाहावा!

Election: मोठी बातमी! दुष्काळामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वाहनाला लागली अचानक आग

Accident News : महामार्गावर विचित्र अपघात! भरधाव कारची दुचाकीला धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra MLC Election Results 2026: २३ तासांपासून मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर; मविआ ३ तर महायुती २ जागांवर आघाडीवर

SCROLL FOR NEXT