Anushka Sharma fined for riding on bikes without helmet Saam TV
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma Fined By Mumbai Police: अखेर अनुष्काच्या बॉडीगार्डवर कारवाई; मुंबई पोलिसांनी आकाराला१० हजार रुपयांचा दंड

Anushka Sharma's Bodyguard: अनुष्का शर्मा बॉडीगार्ड सोनू शेखच्या बाईकवर बसून मुंबईच्या रस्त्यावर दिसली होती.

Pooja Dange

Mumbai Police Took Action On Anushka Sharma: अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड विना हेल्मेट बाईक चालवत असतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. अनुष्का तेव्हा त्याच्या मागे बसली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकजऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. हेल्मेटशिवाय बाईक चालविल्याने आणि परवान्याशिवाय वाहन चालविल्याबद्दल अनुष्काच्या बॉडीगार्डला 10,500 रुपयांचा दंड आकारला आहे.

अनुष्का शर्मा बॉडीगार्ड सोनू शेखच्या बाईकवर बसून मुंबईच्या रस्त्यावर दिसली होती. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. बुधवारी, मुंबई वाहतूक पोलिसांनी तक्रारीचे फोटो ट्विट करत लिहिले, "कलम 129/194(डी), कलम 5/180 आणि कलम 3(1)181 एमव्ही कायद्यानुसार चालकाला रु. १०५०० च्या दंडासह चलन जारी करण्यात आले आहे. (Latest Entertainment News)

अनुष्का शर्माला पाराझींनी बाईकवरुन जाताना स्पॉट केले होते. ती देखील विना हेल्मेट दुचाकीवर बसली होती. अशा परिस्थितीत या दोघांनाही वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अनुष्का शर्माशिवाय अमिताभ बच्चन यांच्यावरही हेल्मेट न घातल्याने टीका झाली होती. मात्र, यामागचे खरे कारण अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले आहे. अमिताभ यांनी लिहिले आहे, "बाईकच्या फोटोतून बरेच अर्थ काढले गेले..!

तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत रस्त्यावर कसे फिरता..? सुरक्षा नाही..? तुमची काळजी घ्या..? आणि मग . . नो हेल्मेट..!!!!!! वस्तुस्थिती अशी आहे की हे मुंबईच्या रस्त्यावर लोकेशन शूट सुरू आहे.. रविवार होता.. बॅलार्ड इस्टेटच्या गल्लीत शूटिंगसाठी ऑफिशिअली परवानगी घेतली होती..

रविवार यासाठी कारण सर्व कार्यालये बंद असतात आणि सार्वजनिक कार्यक्रम किंवा रहदारी नव्हती.. या भागातील एक लेन शूटसाठी पोलिसांच्या परवानगीने बंद आहे.. जेमतेम 30-40 मीटरची लेन आहे.. मी परिधान केलेला ड्रेस हा चित्रपटासाठी माझा आऊटफिट आहे. ."

तसेच ते पुढे म्हणाले, "आणि .. मी फक्त एका क्रू मेंबरच्या बाईकवर बसून सगळ्यांची मजा घेत होतो.. पण वेळ वाचवण्यासाठी मी प्रवास केला आहे, असा भास यातून होत आहे .. . पण हो, वेळेवर कुठे पोहोचायचे असल्यास मी असे करेन.. आणि हेल्मेट घाला आणि वाहतूक मार्गदर्शिकेचे सर्व नियम आणि नियमांचे पालन करा.. मी एकटाच नाही जो असे करतो... किंवा असे करणार पाहिले असेन. अक्षय कुमारने अनेक वेळा बाईकचा वापर करतो.. हेल्मेट घालून, त्याला अद्याप कोणी ओळखू शकले नाही.. आणि हा प्रवास जलद आणि कार्यक्षम होते.. आणि हे चांगले आहे ..."

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का गेल्या काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवरील ‘काला’ या वेबसीरीजमध्ये दिसली होती. या महिन्यात ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील दिसणार आहे. सोबतच, अनुष्का सध्या ‘चकडा एक्सप्रेस’मधून पुनरागमन करणार आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित चित्रपटाची कथा क्रिकेटर झुलन गोस्वामीवर चित्रित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT