Anurag kashyap Google
मनोरंजन बातम्या

Anurag Kashyap Public Apology: 'मी माझ्या मर्यादा विसरलो...'; कुटुंबाला मिळालेल्या धमकीमुळे अनुराग कश्यपने मागितली माफी

Anurag Kashyap: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या जातीवादी विधानानंतर गदारोळ सुरू आहे. त्याने ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या.

Shruti Vilas Kadam

Anurag Kashyap Public Apology: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या जातीवादी विधानानंतर गदारोळ सुरू आहे. त्याने ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या दरम्यान दिग्दर्शकाने सांगितले की त्याचा कुटुंबाला जिवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. दरम्यान, त्याने एक पोस्ट जारी करून ब्राह्मण समाजातील लोकांची माफी मागितली आहे.

अनुराग कश्यप जातीवादी विधान करून प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर ब्राह्मण समाजातील लोकांमध्ये चित्रपट निर्मात्याविरुद्ध संताप दिसून आला. मनोज मुंतशीर शुक्ला यांनीही त्याला मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला होता. सोशल मीडियावरही त्याला खूप विरोध होत आहे. आता अनुराग कश्यपने कबूल केले आहे की तो त्याच्या मर्यादा विसरला होता. त्याने एक लांब पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे.

अनुराग कश्यप यांनी मागितली माफी

अनुराग कश्यपने पोस्ट शेअर केली आणि लिहिले, "रागाच्या भरात एखाद्याला उत्तर देताना मी माझ्या मर्यादा विसरलो. आणि मी संपूर्ण ब्राह्मण समुदायाबद्दल वाईट बोललो. ज्या समुदायाचे अनेक लोक माझ्या आयुष्यात आहेत, ते अजूनही तिथे आहेत आणि खूप योगदान देतात. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले आहेत. माझे कुटुंब माझ्यामुळे दुखावले आहे. अनेक बुद्धिजीवी, ज्यांचा मी आदर करतो, ते माझ्या रागामुळे आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे दुखावले आहेत."

ब्राह्मण समाजाबद्दल त्यांनी काय म्हटले?

खरंतर, अनुराग कश्यपने एखाद्याला उत्तर देण्यासाठी ब्राह्मण समाजावर अपमानजनक टिप्पणी केली होती. त्यानंतर गोंधळ उडाला. त्याने आधीही माफी मागितली होती, पण ती व्यंगात्मक पद्धतीने. त्याने म्हटले होते की त्याने चुकीचे शब्द निवडले होते पण भावना बरोबर होत्या. पण जेव्हा प्रकरण शांत झाले नाही तेव्हा त्याने आता एक लांब पोस्ट लिहून माफी मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महावितरणचा मोठा झटका! वीज बिल थकलं तर घरात लगेच अंधार; नव्या नियमाने उडाली खळबळ

Oral Health : तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

SCROLL FOR NEXT