Anurag Kashyap And Hansal Mehta On Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anurag Kashyap And Hansal Mehta On Kangana Ranaut: 'मी खूप उद्धट आणि जिद्दी आहे', कंगना रनौतची इन्स्टा पोस्ट चर्चेत; असं का म्हणाली?

Kangana Ranaut News: दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेते हंसल मेहता यांनी तिच्या कामाचे कौतुक केले असून तिच्या स्वभावावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Anurag Kashyap And Hansal Mehta On Kangana Ranaut

दिग्दर्शक अभिनेता अनुराग कश्यप आणि अभिनेता झीशान अय्युब सध्या ‘हड्डी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच अनुराग आणि झीशानने एका हिंदी वेबसाईटला मुलाखतीत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी कंगना रनौतबद्दल काही विधान केले आहे. यावेळी त्यांनी मुलाखतीत तिच्या कामाचे कौतुक केले असून तिच्या स्वभावावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. नुकतंच कंगना रनौतने सोशल मीडियावर मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला असून तिने स्वत:ला ग्रेट म्हटले आहे. सोबतच सर्वच लोकं मान्य करतात की मी खूप उद्धट आहे.

नुकतंच अभिनेता अनुराग कश्यप आणि अभिनेता झीशान अय्युबने ‘जिस्ट’ या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. झीशान मुलाखतीत म्हणाला, ‘कंगना एक अप्रतिम अभिनेत्री आहे.’ पुढे अनुराग म्हणतो, ‘कंगनाची कोणासोबतच बरोबरी होणे कठीण आहे, ती एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी आहे. ती नेहमीच आपल्या कामाबद्दल फार प्रामाणिक आहे. तिच्यातलं टायलेंट आपण कधीच हिसकावून घेऊ शकत नाही.’ कंगनाने आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. शेअर केलेला व्हिडीओ हंसल मेहताचा आहे.

त्यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘कंगना एक अभिनेत्री म्हणून खूप अप्रतिम आहे. भारतात टॅलेंटेड सेलिब्रिटींची खूप कमी आहे. ‘सिमरन’ एक कमकुवत चित्रपट होता. त्यामध्ये देखील तिने उत्तम अभिनय केला होता. तिच्या सारखे टॅलेंट भारतीय सेलिब्रिटींमध्ये हवे. मी कायमच तिच्या अभिनयाचा आदर करतो. जरीही तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही वैयक्तिक मतभेद असलेतरीही मी नेहमीच तिचा आदर करतो.’ तिने ही मुलाखत शेअर करताना हंसल मेहताचे आभार मानलेले आहेत. (Bollywood Film)

कंगनाने आणखी एक स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामध्ये कंगना म्हणते, ‘उजव्या आणि डाव्या विचारसरणीचे लोकं या विचारासोबत सहमत आहेत.’ पहिलं म्हणजे मी खूप उद्धट आहे. दुसरं म्हणजे,माझा हिंसक आणि अतिरेकी स्वभाव आहे. मला नेहमीच हिंसा आवडते. तिसरं म्हणजे, मी थोडी बिघडलेली आणि थोडी जिद्दीही आहे. आणि चौथा म्हणजे, माझ्यामध्ये भयंकर टॅलेंट आहे. म्हणजे G.O.A.T सारखं (G.O.A.T- Greatest Of All Times) याला म्हणतात बॅटमॅन. आणि मी बॅटमॅनच आहे. (Entertainment News)

Kangana Ranaut Instagram Story

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT