Super Dancer 3 Controversy  Saam TV
मनोरंजन बातम्या

Super Dancer 3 In Trouble : 'सुपर डान्सर 3'च्या परीक्षकांचा ओव्हरस्मार्टनेस नडला, NCPCR ची थेट चॅनलला नोटीस

Super Dancer 3 Controversy : डान्स रिअ‍ॅलिटी शो 'सुपर डान्सर 3' वादात अडकला आहे.

Pooja Dange

Anurag Basu Breaks Silence In Super Dancer 3 Controversy :

डान्स रिअ‍ॅलिटी शो 'सुपर डान्सर 3' वादात अडकला आहे. एका अल्पवयीन मुलाला अश्लील प्रश्न विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद वाढला. हे प्रकरण नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) पर्यंत गेले असून त्यांनी शोच्या निर्मात्यांना आणि चॅनलला मुलाला असा प्रश्न विचारल्याबद्दल नोटीस बजावली.

सुपर डान्सर 3 चा हा भाग 2019 मध्ये प्रसारित झाला. त्यावेळी अनुराग बासू, शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर या शोमध्ये परीक्षण करत होते. नुकतेच अनुराग बासू यांनी या वादावर मौन सोडले आणि हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.

ETimes शी बोलताना अनुराग बासू म्हणाले, "मी याचा बचाव करणार नाही कारण मला समजते की हे पालकांसाठी किती लाजिरवाणे होते आणि मी स्वत: दोन मुलांचा बाप आहे. सुपर डान्सर हा मुलांसाठीचा डान्स रिअॅलिटी शो आहे आणि मुले अनेकदा निष्पाप गोष्टी सांगतात.

आम्ही त्यांच्यासोबत उभे राहतो. ते तासनतास शूट करतात. ते अनेक गोष्टी सांगतात ज्या कधी कधी कोणाच्या कंट्रोलमध्ये नसतात. मी सहमत आहे की मी स्पर्धकांना त्यांच्या पालकांना लाजवेल अशा गोष्टी बोलायला नको होत्या."

अनुराग बासू पुढे म्हणाले की 'मुलांना प्रश्न विचारताना मर्यादा बाळगणे आवश्यक आहे असे मला वाटते. मुलांशी बोलताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण ते कधीकधी निष्पापपणे काही गोष्टी बोलतात ज्या योग्य नसतात. हा भाग एडिट करता आला असता, परंतु ते माझ्या नियंत्रणात नव्हते. परीक्षक म्हणून आपण थोडे सयंमी असायला हवे. प्रश्न विचारताना काळजी घ्या."

काय आहे सुपर डान्सर 3 चा वाद?

अलीकडेच, सुपर डान्सर 3 चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शोच्या एका भागामध्ये परीक्षकांनी एका लहान मुलाला त्यांच्या पालकांबद्दल अयोग्य आणि सेक्सशुअल प्रश्न विचारल्याचे दिसत आहे. जेव्हा वाद वाढला तेव्हा एनसीपीसीआरने हा भाग सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे.

NCPCR ने 2018-19 मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कवर सुपर डान्सर 3 वर 'अयोग्य कंटेंट' प्रसारित केल्याचा आरोप करत नोटीस बजावली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra: संध्याकाळी 'या' वेळेत घरात प्रवेश करते देवी लक्ष्मी; ही खास काम जरूर

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर

Lagnanantar Hoilach Prem : पार्थ पुन्हा काव्याच्या गळ्यात घालणार मंगळसूत्र; डिझाइनही आहे खूप खास, पाहा VIDEO

Biryani Recipe: बासमती तांदळाची व्हेज बिरयानी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

GK : पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT