Rupali Ganguli And Apra Mehta Dance Video Instagram
मनोरंजन बातम्या

Rupali Ganguli And Apra Mehta Viral Video: ‘बहरला मधुमास नवा’ वर थिरकली अनुपमा आणि गुरू माँ, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Rupali Ganguli And Apra Mehta Dance Video: हिंदी टेलिव्हिजन सृष्टीतील सर्वात लोकप्रिय शो असलेल्या ‘अनुपमा’ मधील रुपाली गांगुलीसह अनेक कलाकारांच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Chetan Bodke

Baharla Ha Madhumas Nava Viral Video: हिंदी टेलिव्हिजन सृष्टीतील सर्वात लोकप्रिय शो ‘अनुपमा’ मधील रुपाली गांगुलीच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या हिट शोमधून अभिनेत्रीलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली असून ती पहिल्यापासूनच मालिकेचा ती भाग आहे. रुपालीला तिच्या पात्रासाठी आणि मालिकेतील अभिनयासाठी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. नेहमीच तिचे ‘डाऊन टू अर्थ’ (Down To Earth) या स्वभावासाठी सर्वच प्रेक्षक कौतुक करतात.

अभिनेत्री रूपाली गांगुली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच तिने एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओत रूपाली गांगुलीसोबत गुरु मा बनलेल्या अपरा मेहतासोबतचा तिने एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या दोघींनीही ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील सर्वाधिक फेमस ठरलेलं ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर एक सुंदर व्हिडीओ बनवून शेअर केला.

रुपाली गांगुली आणि अपरा मेहताचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर रुपाली आणि अपाराने व्हॅनिटी कारमध्ये शूट केला आहे.

अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "गुरुमा आणि अनुपमा, मी आज मराठी गाण्यासोबत लिप सिंक करून गाणं गायलं, या गाण्यावर व्हिडीओ बनवायला उशीर झाला. ही अद्भुत स्त्री आणि उत्कृष्ट कलाकारासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना खूप मजा आली, अपराजी - तुम्ही एक लीजेंड आहेत.  (Entertainment News)

अपरा मेहता देखील पोस्टवर कमेंट करत म्हणते, "रुपाली तुझ्यासोबत अभिनय करताना मला खूप आनंद होतो. कलेवर प्रेम करणाऱ्या अभिनेत्यांपैकी तू एक आहेस. तुझा अभिनय इतरांपेक्षा वेगळा आहे. कृपया आपण नेहमी नम्र रहा. देव तुमचे भले करतो.” तर अनेक चाहत्यांनी दोन्ही अभिनेत्रींच्या डान्सचे कौतुक केले आहे. अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुलीने हा व्हिडिओ शेअर करताच अनेक चाहत्यांनी आणि मालिकेतील सहकलाकारांनी कमेंट करायला सुरुवात केली आणि दोघींचेही तोंडभरून कौतुक केले.

‘अनुपमा’ मालिकेत प्रमुख भूमिकेत रुपाली गांगुली, गौरव खन्ना आणि सुधांशू पांडे यांच्या व्यतिरिक्त या शोमध्ये मदालसा शर्मा चक्रवर्ती, सागर पारेख, निधी शाह, आशिष मेहरोत्रा, मुस्कान बामणे, अश्लेषा सावंत सह अनेक कलाकार आहेत. ही मालिका स्टार प्लसवर या टेलिव्हिजन चॅनलवर टेलिकास्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, कॅबिनेट मंत्र्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Fact Check: टीव्ही पाहाल तर किडनी गमवाल? लठ्ठपणा, डायबेटीज, ब्लडप्रेशरचाही धोका?

कावळ्याला वाटलं विजय आपलाच! पण शेवटच्या क्षणी गिधाडाने डाव पलटला; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये पाणी चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल,300 जणांना नोटिसा!

शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठी अपडेट! OTS अंतर्गत पहिली यादी जाहीर; 1.69 लाख शेतकऱ्यांना संधी, यादीत तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT