Anupama saam tv
मनोरंजन बातम्या

Anupama Serial New Twist: 'अनुपमा'मध्ये नवा ट्विस्ट, अनुपमाची मुलगी पडली प्रेमात, कोण आहे प्रेम?

Saam Tv

स्टार प्लस या चॅनेलवरील 'अनुपमा' या सुप्रसिद्ध मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रेक्षक या मालिकेला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. 'अनुपमा' हे पात्र प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचे आहे. स्टार प्लस चॅनेलवरील अनुपमा मालिकेचा टीआरपी सगळ्यात जास्त आहे. मालिकेतील अनुपमा आणि अनुज या दोघांचे आयुष्य आणि त्यात येणारे रंजक प्रसंग प्रेक्षकांचे मन खिळवून ठेवते.

अनुपमासोबत दिसणार दोन नवी पात्र

अनुपमा मालिकेच्या प्रत्येक भागात तुम्हाला नवीन आणि मनोरंजक प्रसंग पाहायला मिळतात. त्यामुळे स्टार प्लस या चॅनेलचा टीआरपी वाढत आहे असे म्हणायला हरकत नाही. आता प्रेक्षकांसाठी आणखी एक सरप्राईज आहे. कारण 'अनुपमा' मालिकेत टाईम जंप होणार आहे. अनुपमा हे पात्र साकारणारी 'रुपाली गांगुली' या अभिनेत्रीसोबत दोन नवीन कलाकार या मालिकेत पदार्पण करणार आहेत. अशाप्रकारे, मालिकेमध्ये अभिनेत्री अलिशा परवीन आध्याची भुमिका साकारणार असून अभिनेता शिवम खजुरिया आध्याच्या 'प्रियकराची' भुमिका साकारणार आहे.

आता होणार अनुपमा आणि आध्यामध्ये दुरावा

अनुपमा या मालिकेच्या टीमने नुकतेच एक प्रोमो रिलीज केले आहे. त्यात अनुपमाच्या नवीन वाटचालीची सुरुवात झाली आहे हे दाखवण्यात आले आहे. या प्रोमोमध्ये, अनुपमाचा एक नवीन लुक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुपमा तिचा व्यवसाय सुरु करताना दिसत आहे. अनुपमा आपल्या कुटुंबाविषयी विचार करते आणि तिला मुलीला म्हणजेच आध्याला भेटायची इच्छा असते.

दरम्यान, आध्या एक टूर मार्गदर्शक बनली आहे. हे सगळं होत असताना आध्याला मंदीरात प्रेम दिसतो. त्याचक्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. आध्या नात्यातील अडचणींबद्दल विचार करते. तेव्हा ती आई पासून वेगळे राहण्याचा विचार करते. आता ही नवीन व्यक्ती आई आणि मुलीचे नाते जोडायला मदत करेल का? आई आपल्या मुलीला मिळवू शकेल का? असे प्रश्न प्रेक्षकांमध्ये सुरु आहेत.

Written By : Sakshi Jadhav

Health Tips: घामाच्या वासामुळे त्रस्त असाल तर 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

Doraemon चा आवाज देणाऱ्या अभिनेत्रीचं निधन

Heavy Rain : जळगाव, धुळ्यात परतीचा जोरदार पाऊस; मका, ज्वारीचे मोठे नुकसान

Maharashtra News Live Updates : बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरण,आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Amit Thackrey : अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार; विधानसभेत करणार मदत?

SCROLL FOR NEXT