Parenting Tips : अभ्यासाला बसताच मुलांना झोप येण्यास सुरुवात होते? 'या' पॅरेंटिंग टिप्स नक्की फॉलो करा

How to Avoid Sleep While Studying : अभ्यास करताना लहान मुलांना सतत झोप येत असेल तर त्यांची झोप दूर करण्यासाठी पुढील गोष्टी पालकांनी निट लक्षात ठेवल्या पाहिजेत.
How to Avoid Sleep While Studying
Parenting TipsSaam TV
Published On

प्रत्येक आई वडिलांना आपलं मुल हुशार असावं असं वाटतं. त्यासाठी पालक मुलांना विविध गोष्टी शिकवतात. शाळेसह क्लास आणि एक्स्ट्रा अॅक्टीविटी सुद्धा सुरू करतात. मुलं दिवसभर कामात आणि अभ्यासात व्यस्त राहिल्याने हुशार होतात असा अनेक पालकांचा समज आहे. लहान मुलांना अभ्यास म्हटलं की, नकोसं वाटतं. त्यांना सतत खेळावं असं वाटत असतं.

How to Avoid Sleep While Studying
Parenting Tips : तुमची मुलं सतत वाद घालतात? पालक म्हणून कसे वागावे, जाणून घ्या

अभ्यास करण्यासाठी मुलं एकाजागी बसत नाहीत. अभ्यास सुरु केल्यावर लगेचच त्यांना भूक लागते. तसेच काही मुलांना लगेचच झोप येते. झोप आल्यावर मुलांना ते काय अभ्यास करत आहेत हे सुद्धा समजत नाही. आता तुमच्या मुलांबरोबर सुद्धा असं घडत असेल तर सावधान. मुलांना अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून पालकांनी पुढील गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मुलांच्या झोपेचं वेळापत्रक

लहान मुलांपासून मोठ्या व्यक्ती आणि पशू, पक्षी, प्राणी अशा सर्वच सजिवांना झोपेची आवश्यकता असते. झोप पूर्ण झाली तरच व्यक्तीला फ्रेश आणि ताजे, तवाणे वाटते. त्यामुळे मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी झोपेची एक वेळ निश्चित करून ठेवा. ठरवलेल्या वेळेत मुलांना काही करून झोपण्यास सांगा. असे केल्याने त्यांची झोप पूर्ण होते. तसेच अभ्यास करताना मुलांना झोप येत नाही.

वेळोवेळी ब्रेक घ्या

सतत एकाच जागी बसून अभ्यास करणे कठीण असते. त्याने पाय आखडतात, तसेच शांत बसल्यामुळे आपल्याला झोप सुद्धा येते. अशा पद्धतीने मुलांना झोप येऊ नये म्हणून प्रत्येक ३० मिनिटांत मुलांना ५ मिनिटांचा ब्रेक द्या. यामुळे त्यांचा मेंदू फ्रेश राहील. तसेच जास्त ताण येणार नाही.

हेल्दी डायेट आणि हायड्रेटेड

लहान मुलांचं आरोग्य जपणे फार कठीण गोष्ट असते. मुलं लहान आणि नाजूक असल्याने सतत आजारी पडतात. मुलं आजारी पडल्यावर त्यांचं अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे त्यांना वेळोवेळी हेल्दी डायेटसह हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. काही मुलं पाणी जास्त पित नाहीत. त्यामुळे देखील त्यांना मंद आणि अशक्त वाटते.

व्यवस्थित बसा

अभ्यास करताना कंफर्टेबल बसणे गरजेचं असतं. मात्र काही मुलं जमीनिवर पाठीला अगदी बाक आलेला असताना सुद्धा तसेच बसून राहतात. त्याने पाठीच्या मनक्याच्या समस्या आणखी वाढतात. त्यामुळे अभ्यास करताना व्यस्थित बसणे महत्वाचे आहे.

How to Avoid Sleep While Studying
Sleeping Competition 2024 : झोप काढा, लखपती बना ! स्पर्धा जिंकत तरुणीने कमवले ९ लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com