Rupali Ganguly Christmas Celebration Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: रुपालीचे क्रिसमसनिमित्त केले चाहत्यांचे मनोरंजन, हूक स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधले...

रुपाली गांगुलीने सॅन्टा क्लॉज बनून नेटकऱ्यांचे केले मनोरंजन.

Pooja Dange

Rupali Ganguly Video: टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली 'अनुपमा' या मालिकेमुळे चर्चेत आहे. नुकताच रुपालीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली क्रिसमस साजरा करताना दिसत आहे. सॅन्टा क्लॉजच्या रूपात रुपाली 'जिंगल बेल्स' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

रुपाली गांगुलीने लाल रंगाचा टी-शर्ट आणि ब्लॅक रंगाची पॅन्ट घातली आहे. तसेच तिने डोक्यावर सॅन्टा क्लॉजची टोपी सुद्धा घातली आहे. तसेच तिने हा व्हिडिओ शेअर करताना एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. 'वर्षातील ही वेळ नाचण्यासाठी आहे. कारण सॅन्टा आम्हाला आनंद देण्यासाठी आनंदाने भरलेली पिशवी घेऊन येणार आहे!! मेरी ख्रिसमस.' असे कॅप्शन दिलेल्या या व्हिडिओमध्ये रुपाली ख्रिसमसचा आनंद घेताना दिसत आहे. (Social Media)

रुपाली गांगुलीच्या या व्हिडिओवर तिचे फॅन्स कमेंट करत आहेत. रुपालीच्या फॅन्सला तिचा हा लूक खूप आवडला आहे. फॅन्स कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तसेच रुपाली खूप सुंदर आहे असे म्हणत आहेत.

रुपाली 'साराभाई व्हर्सेस साराभाई', 'बा बहू और बेबी', 'परवरिश - कुछ खट्टी कुछ मेथी', 'संजीवनी' आणि इतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'अनुपमा' या मालिकेतील भूमिकेमुळे ती पुन्हा घराघरात पोहोचली आहे. तिचा हा शो अनेकदा टीआरपीमध्ये नेहमीच टॉपला असतो. (Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT