The Kashmir files Movie at Filmfare 2023 saam tv
मनोरंजन बातम्या

The Kashmir Files At Filmfare: फिल्मफेयरमध्ये 'द काश्मीर फाईल्स'ला डावलल्याने अनुपम खेर यांनी व्यक्त केली नाराजी

The Kashmir Files Did Not received Any Award: द काश्मीर फाइल्सला सात श्रेणींमध्ये नामांकने मिळाली होती, पण या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही.

Pooja Dange

Anupam Kher Reaction on The Kashmir Files at Filmfare: बॉलिवूडमधील मनाचा समजला जाणार फिल्मफेयर पुरस्कार सोहळा काल पार पडला. मुक्ताच्या उद्दघाटन झालेल्या जिओ कॉन्व्हेशन सेन्टरमध्ये फिल्मफेअर पुरस्कार 2023 संपन्न झाला. या सोहळ्यात आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी आणि राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'बधाई दो' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, द काश्मीर फाइल्सला सात श्रेणींमध्ये नामांकने मिळाली होती, पण या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही. यावर आता अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीर फाइल्सला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सात नामांकने मिळाली होती, पण या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही. अभिनेते अनुपम खेर यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत एक सूचक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, इज्जत एक महागडी भेट आहे, याची अपेक्षा स्वस्त लोकांकडून करू नका. या पोस्टसोबत त्यांनी द काश्मीर फाइल्स असेही लिहिले आहे.

याआधी विवेक अग्निहोत्रीने फिल्मफेअर अवॉर्ड्सवर ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेक यांनी म्हटले होते, 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा माझा निर्णय म्हणजे बॉलिवूडच्या भ्रष्ट आणि अनैतिक व्यवस्थेविरुद्धचा माझा आवाज आहे.

मी असे पुरस्कार स्वीकारणार नाही, असे ठरवले आहे. दिग्दर्शक-लेखक, अभिनेता आणि चित्रपटातील क्रू मेंबर यांना स्टार्सचे गुलाम समजणाऱ्या व्यवस्थेचा मी स्वत:ला भाग मानत नाही.

द काश्मीर फाईल्स चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यांसारख्या विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. या चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार या कलाकारांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Money Astrology: या राशींचे लोक होणार धनवान, रखडलेले पैसेही हातात मिळणार

SCROLL FOR NEXT