अनुपम खेर  Twitter/ @AnupamPKher
मनोरंजन बातम्या

Anupam Kher Upcoming Movies: शूटिंग दरम्यान चाहत्यांचे प्रेमाने अनुपम खेर भावूक; सोशल मीडियावर पोस्ट शेअर

आग्रा येथील शूटिंग दरम्यान भारावलेल्या अनुपम खेर यांनी मानले फॅन्सचे आभार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दिग्गज अभिनेते अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतात. अनुपम खेर सध्या आग्रा येथे शूटिंग करत आहेत. 'कुछ खट्टा हो जाए' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ते सध्या व्यस्त आहेत. अनुपम खेर यांचा हा ५३२वा चित्रपट (Movie) आहे.

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये ते त्यांच्या फॅन्सना भेटत आहेत. "आज आग्र्यातील लोकांचे भरपूर प्रेम मिळाले. एका कलाकारासाठी यापेक्षा जास्त सन्मान काय असू शकतो. लोकांच्या या प्रेमाने मी पुरता भारावून गेलो आहे. आज आग्रा येथे 'कुछ खट्टा हो जाए'चे शूट करत आहे." असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.

पंजाबी गायक (Singer) गुरु रनधावा 'कुछ खट्टा हो जाए' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी इंस्टग्रामवर पोस्ट करत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. त्याने पोस्टला "जास्त गोड खाऊन शुगर व्हायला नको...चला 'कुछ खट्टा हो जाए' सादर करत आहे माझ्या पहिल्या चित्रपटाचा पोस्टर! नर्वस आणि एक्सायटेड-दोन्ही," असे कॅप्शन दिले आहे.

'कुछ खट्टा हो जाए' (Kuch Khatta Ho Jaye) या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक जी करत आहे. सई मांजरेकर आणि ईला अरुण सुद्धा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'कुछ खट्टा हो जाए' व्यतिरिक्त अनुपम खेर 'इमर्जन्सी', 'उचाई' आणि 'द सिग्नेचर' या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT