SRK+ OTT App | Salman Khan asked for Party Twitter/@iamsrk
मनोरंजन बातम्या

SRK+ OTT App: शाहरुख खानच्या 'एसआरके प्लस' या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा; सलमाननं मागितली पार्टी...

Shah Rukh Khan OTT App: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने शाहरुखला शुभेच्या तर दिल्या सोबतच "आजची पार्टी तुझ्याकडून" असं म्हणत किंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने एक मोठी घोषणा केली आहे. शाहरुख आता लवकरच स्वत:चं ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव एसआरके प्लस (SRK +) असं असून शाहरुखनं स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे ओटीटी (Over The Top) क्षेत्रात आता किंग खान (Shahrukh Khan) स्वतः येणार असल्यानं मनोरंजन क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (Announcement of Shah Rukh Khan's 'SRK Plus' OTT platform; Salman Khan asked for the Party)

हे देखील पहा -

शाहरुख खानच्या SRK+ OTT Paltform बाबत 'कुछ कुछ होने वाला है ओटीटी की दुनिया मे' (Kuch kuch hone wala hai, OTT ki duniya mein) असं ट्विट करत शाहरुखने आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोगोही शेयर केला आहे. त्याने ट्विट केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने शाहरुखला शुभेच्या तर दिल्या सोबतच "आजची पार्टी तुझ्याकडून" (Aaj ki party teri taraf se @iamsrk Congrats on your new OTT app, SRK+) असं म्हणत किंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही शाहरुखला शुभेच्छा देत "स्वप्नपूर्ती झाली, शाहरुखसोबत त्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे" असं ट्विट अनुरागने केलं. (Dream come true! Collaborating with @iamsrk on his new OTT app, SRK+) हे ओटीटी प्लॅटफॉर्म कधी लॉन्च होणार याबाबत अद्यापतरी अधिकृत माहिती नाही.

आर्यन खान ड्रग्स (Aryan Khan Drugs Case) प्रकरणानंतर शाहरुख काही काळ सोशल मीडियापासून लांब होता. मात्र आता शाहरुख पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकायला तयार आहे. यासाठ बॉलिबूडकरांनी त्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Threat: मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवून देण्याची धमकी, BMC ला पाठवण्यात आला ईमेल; पोलिस यंत्रणा सतर्क

Smartphone Tips : रात्री ब्लँकेटमध्ये फोन चार्जिंगला लावताय? ३ चुका बॅटरीचा खेळ संपवतील

Mumbai Indians: आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा डाव, कर्णधारपदाबाबत एका फोटोमधून दिले महत्त्वाचे संकेत!

Western Railway : लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांची लोकल वांद्र्यापर्यंत धावणार; काम अंतिम टप्प्यात

Shocking : मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या तरुणीसोबत दिवसाढवळ्या भयंकर घडलं, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT