Ankita Walawalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar : अंकिता वालावलकरने सुरू केला NGO, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "चला बदल घडवूया"

Ankita Walawalkar Start New NGO : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने नवीन NGO सुरू केला आहे. ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

अंकिता वालावलकरने नवीन NGO सुरू केला आहे.

अंकिताने पनवेल, नवी मुंबई येथे NGO सुरू केला आहे.

अंकिताने NGO बद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 'बिग बॉस मराठी 5' अंकिताला खूप लोकप्रियता मिळाली. अंकिता कायम स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतीच तिने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या नवीन उपक्रमाची माहिती दिली आहे. अंकिता वालावलकरने स्वतःचा नवीन NGO सुरू केला आहे. ज्याची संपूर्ण माहिती तिने एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे.

NGOचे नाव काय?

अंकिता वालावलकर आणि तिचा नवरा कुणाल भगतने सुरू केलेल्या नवीन NGOचे नाव Arthanexus Global Foundation असे आहे. हे फाउंडेशन आरोग्य, शिक्षण आणि प्राण्यांसाठी काम करणार आहे. हा NGO पनवेल, नवी मुंबई येथे आहे. व्हिडीओच्या शेवटी अंकिता वालावलकरने प्रेक्षकांना देखील मदतीचे आव्हान केले आहे. तसेच NGOमध्ये स्वयंसेवक होण्यासाठी एक चांगली संधी देखील दिली आहे. अंकिताच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहे.

अंकिता वालावलकर पोस्ट

"नमस्कार मंडळी!

आपण कायमच एकत्र येऊन छान काम केलं आहे. आता वेळ आहे या कामाला आणि आपल्या या एकजुटीला एक नाव देण्याची. 'कोकण हार्टेड गर्ल' पासून सुरुवात झाली आणि पुढे 'महाराष्ट्र हार्टेड गर्ल' ही ओळख बनली. पण या वाटचालीत मला खरी साथ दिलीत ती तुम्ही सगळ्यांनीच. कोकणच्या चेडवाची खरी 'भावकी' तुम्हीच तयार केलीत! आज आपल्या NGO ची सुरुवात होत आहे. Arthanexus Global Foundation च्या माध्यमातून ही 'भावकी' आता अजून छान काम करत राहील. एकजुटीतून घडलेली भावकी, आता नव्या वाटेवर Arthanexus Global Foundation

चला बदल घडवूया!"

NGOचे तीन संकल्प

  1. गरजूंपर्यंत वैद्यकीय मदत पोहचवणे.

  2. शिक्षण हीच खरी ताकद आहे हे ओळखून ज्ञानाचे दार उघडणे.

  3. मूक प्राण्यांचे संरक्षण- यात मूक प्राण्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि उपचारांची सोय करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India VS Pakistan Final: 'ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन तिलक...'; भारताच्या विजयावर मराठी कलाकारांचं सेलिब्रेशन

हम साथ '७' है! सूर्यानं पुन्हा मन जिंकलं, आशिया चषकातील सगळे पैसे आर्मीला दिले

अहिल्यानगरात मुस्लिम समाज रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज; तेढ का निर्माण झाला? कारण समोर | VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याण नगर मार्गावरील शहाड पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

Box Office Collection : 'जॉली एलएलबी 3', 'होमबाउंड' की 'ओजी'; बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? वाचा संडेचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT