Ankita Lokhande Pregnancy Saam TV
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande Pregnancy: पाहुणा घरी येणार येणार गं...; अंकिताकडे आहे गोड बातमी?

Ankita Lokhande Baby Bump: अशात आता ही अभिनेत्री तिच्या काही फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Ruchika Jadhav

Ankita Lokhande: अंकिता लोखंडे ही अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सातत्याने व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर तिचा फार मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे फोटो पोस्ट केल्याबरोबर त्यावर लाखोंच्या घरात लाईक्सचा वर्षाव होतो. अशात आता ही अभिनेत्री तिच्या काही फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Latest Ankita Lokhande Pregnancy News)

येणार घरी नवा पाहूना

अंकिता लोखंडे ही अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अशात नुकतेच तिने साडीमधील काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. हे फोटोपाहून अंकिताकडे बाळाची गोड बातामी असल्याच्या चर्चा सुरु आहेत. लवकरच ती आई होणार असं म्हटलं जातंय. अंकिता आणि विकी जैन या दोघांचे एकत्र अनेक फोटो आता व्हायरल होतायत.

आई बाबा होणार?

अंकिता आई आणि विकी बाबा होणार असं म्हटलं जातंय. दोघांविषयी सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू होताच अनेकांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र या चर्चा खऱ्या आहेत की खोट्या हे अद्याप समजू शकलेलं नाही. कारण अंकिता किंवा विकी या दोघांपैकी कोणीही यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकीटात झाकला बेबी बंप

अंकिताने स्टायलीश साडी नेसली असून या साडीवर तिने लो बन टाकला आहे. तसेच कानात हेवील इअरींग्स घालून ती फार देखणी दिसत आहे. यावेळी एका फोटोत तिने पोटावर हात ठेवला आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये आपला बेबी बंप पाकीटात झाकत आहे. त्यामुळे अंकिता गोड बातमी देणार या चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Utsav 2025 : गणेशोत्सवात लेसर बंदी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार फौजदारी कारवाई

धक्कादायक! पुण्यात वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर तरुणीने संपवले आयुष्य; नेमकं मध्यरात्री काय घडलं?

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Raksha Bandhan: भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडे का जाऊ नये? धार्मिक ग्रंथांमधून समोर आलं महत्त्वाचं कारण

Pune To Dadar: पुण्याहून दादरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? ट्रॅफिकपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT