Anita Hassanandani canva
मनोरंजन बातम्या

Anita Hassanandani: प्रेग्नेंसीनंतर अख्खं वैवाहिक जीवन बदलून जातं; अभिनेत्रीचा खुलासा, चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला

Anita Hassanandani on Good Relationship: अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी टेलिव्हिजवरील पावर कपल मानलं जातं. अभिनेत्री अनिताने तिच्या चाहत्यांना प्रेग्नेंसीनंतरचा सुखी आयुष्याचा जिवन मंत्र दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्टार प्लसवरील "ये है मोहब्बतें" या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनिता हसनंदानी एका लॉंग ब्रेक नंतर तिच्या अभिनय करियरला पुन्हा सुरुवात करणार आहे. "ये है मोहब्बतें" या मालिकेमुळे अभिनेत्रीला भरपूर प्रसिद्ध मिळाली होती. या मालिकेमध्ये अनिताने खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्या मालिकेनंतर अनिताने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. अनिता २०२१मध्ये एका गोंडस बाळाची आई झाली होती. त्यामुळे अभिनेत्रीने अभिनयापासून थोडा ब्रेक घेऊन तिच्या मुलाच्या संगोपणाकडे लक्ष दिलं होतं. पंरतु आता मुलगा मोठा झाल्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पद्द्यावर एन्ट्री करणार आहे.

अभिनेत्री अनिता तिच्या सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीनंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल झाले याची माहिती दिली होती. प्रेग्नेंसीनंतर रिलेशनशिपमध्ये खसकर सेक्स लाईफमध्ये अनेक बदल होतात.

अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिलेल्या माहितीनुसार, प्रेग्नेंसीनंतर एखाद्या कपलच्या आयुष्यात एका नव्या पाहुन्याचं आगमन होतं. त्यामुळे एकमेकांना वेळ देणं खुप कठीण होतं. बाळ झाल्यानंतर एखाद्या स्त्रीचं आयुष्य बदलून जातं तिच्या शरिरामध्ये अनेक हार्मोनल बदल होतात त्यासोबत बाळाची काळजी आणि स्वता:कडे लक्ष देण्यात वेळ जातो. त्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर भरपूर परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या जोडीदाराने तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं. परंतु नात्यामधील प्रेम कायम ठेवण्यासाठी जोडीदारासोबत वेळ घालवणं गरजेचं असतं. बाळ झाल्यानंतर चांगल्या वैवाहिक जिवनासाठी तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा नेहमी पाठींबा मिळाला पाहिजेल. तुम्हाला तुमच्या डिजायर आणि आपेक्षा तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करणं गरजेचं असतं.

त्यानंतर अनिता म्हणाली की, "जर तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदानी घालवायचं असेल तर तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करा. अनेकदा मनामध्ये विचार येतो की समोरच्याला आपल्या मनातील गोष्टी कळाव्या आणि त्या नाही कळल्यास नात्यांमध्ये दूरावा येण्यास सुरुवात होते. सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सेक्स लाईफ खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भावना आणि इच्छा जोडीदारासमोर नक्की व्यक्त करा." अभिनेत्री अनिता तिच्या 'नागिन' या मालिकेमुळे अनेक चाहत्यांच्या मनामनामध्ये पोहचली.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT