Rajesh Khanna and Anita Advani Saam tv
मनोरंजन बातम्या

Anita Advani And Rajesh Khanna: 'दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा स्पर्श...'; राजेश खन्ना यांच्या आठवणीत अनिता अडवाणी नेमकं काय बोलल्या?

Anita Advani And Rajesh Khanna Story: अनिता अडवाणी यांनी दिलेल्या नव्या मुलाखतीत त्यांच्या आणि दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यातील नातेसंबंधाविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Anita Advani And Rajesh Khanna: अनिता अडवाणी यांनी दिलेल्या नव्या मुलाखतीत त्यांच्या आणि दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यातील नातेसंबंधाविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. अनिता यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की त्यांचा आणि राजेश खन्नांचा परिचय त्यांच्या तारुण्यात झाला होता. त्या लहान वयातच या नात्याने इतका खोल ठसा उमटवला की त्यानंतर आयुष्यभर त्या दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला जवळ करू शकल्या नाहीत. “राजेश खन्नांसोबतचा सहवास इतका गडद होता की दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा स्पर्श मला स्वीकारणे शक्य झाले नाही,” असे अनिता यांनी भावूक होत सांगितले.

अनिता अडवाणी यांनी पुढे सांगितले की त्या जवळपास १२ वर्षे राजेश खन्नांसोबत राहिल्या. या काळात त्यांनी एकत्र अनेक सुख-दुःखाचा अनुभवली आहेत. त्यांचे नाते इतके घट्ट होते की त्यांना त्या नात्यापासून स्वतःला वेगळे करणे शक्यच झाले नाही. अनिता यांच्या मते, राजेश खन्ना त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले होते.

त्यांनी आणखी एक मोठा खुलासा करत सांगितले की राजेश खन्नांनी घरातील मंदिरात एकदा त्यांना कुंकू लावले आणि त्या क्षणाला त्यांनी स्वतःचे वैवाहिक नाते मानले. त्यावेळी अनिता यांना राजेश खन्नांनी यांनी सांगितले होते की, “आजपासून तू माझी जबाबदारी आहेस.” हा प्रसंग अनिता यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण होता, ज्यामुळे त्यांना सदैव वाटत राहिले की त्या राजेश खन्नांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.

मात्र, राजेश खन्नांच्या निधनानंतर अनिता अडवाणी यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजेश खन्नांच्या कुटुंबीयांनी त्यांना अंतिम संस्कारांमध्ये सहभागी होऊ दिले नाही. इतकेच नाही तर त्यांच्या निधनानंतरच्या विधी असताना देखील त्यांना येऊ नये म्हणून बाउन्सर लावले होते.

अनिता यांनी खेद व्यक्त करत सांगितले की, “राजेश खन्नांच्या अखेरच्या क्षणी मी त्यांच्यासोबत होते. त्यांनी मला कधीच एकटं सोडलं नाही, पण त्यांच्या मृत्यूनंतर मला मात्र एकटं पाडलं गेलं.” तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की राजेश खन्नांच्या कुटुंबाने त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं आणि संपत्तीवर हक्क सांगण्याची संधीही नाकारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप

देवेंद्र फडणवीसांनीही मान्य केली व्होट चोरी; जयंत पाटील म्हणाले आमच्यासोबत या |VIDEO

Govinda Sunita Divorce: 'त्याने मला फसवलं, क्रूर वागला...'; गोविंदावर आरोप, पत्नी सुनीता घेणार घटस्फोट?

देहविक्रीचं मोठं रॅकेट, तरुणींचे फोटो पाठवायचे, १००० रुपये घेऊन घरीच....; आई-मुलाचा खरा चेहरा उघड

Actor Death News : लोकप्रिय अभिनेत्याचे निधन, मनोरंजनसृष्टीवर शोककळा

SCROLL FOR NEXT