Ananya Panday-Aditya Roy Kapur viral photo Instagram
मनोरंजन बातम्या

Ananya Panday-Aditya Roy Kapur Photo: बॉलिवूडचे नवे लव्हबर्ड्स! एकमेकांच्या प्रेमात हरवलेल्या आदित्य-अनन्याचे फोटो व्हायरल

Bollywood New Love Bird : आदित्य आणि अनन्या सध्या पोर्तुगालमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

Pooja Dange

Ananya Panday-Aditya Roy Kapur Viral Photo : सध्या बॉलिवूडमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कपल स्पॉट होत आहे. नुकतेच दोघे सुट्टीवर गेले होते. त्यावेळी सोशल मीडियावर दोघांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. आता त्यांचे नवीन फोटो देखील व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत.

आदित्य रॉय आणि अनन्याचा नवीन फोटो

आदित्य आणि अनन्या सध्या पोर्तुगालमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. या जोडप्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. स्पेनमधील लाइव्ह कॉन्सर्टनंतर लिस्बनमधील रेस्टॉरंटमध्ये वेळ घडवताना दोघे दिसत आहे. (Latest Entertainment News)

यादरम्यान, अनन्याने व्हाईट टी-शर्ट अनन्याने श्रग घातला आहे. लेझी बन, नो-मेकअप लुक आणि बॅकपॅकसह तिने तिचा लूक पूर्ण केला. दुसरीकडे, नाईट मॅनेजर आदित्य रॉय कपूर, कॅज्युअल नेव्ही ब्ल्यू लिनन शर्टमध्ये अतिशय सुंदर दिसत होता.

नाझर पोर्तुगालमध्ये रोमँटिक शैलीत दिसला होता

यापूर्वी लिस्बनमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये आदित्य अनन्याला मिठी मारताना दिसला होता. या फोटोंवरून दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला होता. यादरम्यान अनन्या पांडेने निळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला होता, तर आदित्य टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला.

आदित्य आणि अनन्याचे आगामी चित्रपट

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्रीचा 'खो गये हम कहाँ' हा चित्रपटामुळेही चर्चेत आहे. तसेच अनन्या 'कॉल मी बे' या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. आदित्य लवकरच 'लाइफ इन मेट्रो'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT