Ananya Pandey And Hardik Pandya Dance Ani X
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey And Hardik Pandya Dance : अनंत अंबानीच्या वरातीत अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या जबरदस्त नाचले, ‘झकास’ हूकस्टेप्सने वेधले लक्ष; पाहा व्हिडीओ

Anant Ambani And Radhika Merchant Wedding Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नसोहळ्याला अखेर सुरुवात झालेली आहे. हा विवाहसोहळा मुंबईतल्या बीकेसीमधील "जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर"मध्ये पार पडणार आहे.

Chetan Bodke

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नसोहळ्याला अखेर सुरुवात झालेली आहे. हा विवाहसोहळा मुंबईतल्या बीकेसीमधील "जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर"मध्ये पार पडणार आहे. यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिडासह उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळी लग्नाला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय राज्यासह देशातील राजकीय मंडळीही लग्नाला उपस्थिती लावणार आहेत. सध्या वरातीला सुरुवात झालेली आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटी आणि काही खेळाडू ठेका धरत कार्यक्रमाची शान वाढवली.

अशातच सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री अनन्या पांडे आणि क्रिकेटर हार्दिक पांड्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा अफलातून डान्स करतानाचा व्हिडिओ एएनआयच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये, अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या डान्स करताना दिसत आहे. दोघांनाही अगदी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. त्याशिवाय, पुढे यो यो हनी सिंग ही स्टेजवर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. तो "ब्लू है पानी पानी" गाणं सादर करताना दिसत आहे.

त्याशिवाय रणवीर सिंह सुद्धा अफलातून डान्स करताना दिसत आहे. रणवीर कोणाच्या तरी खांद्यावर बसून डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्सचीही सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून त्यांच्या डान्सची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अनंत अंबानीच्या वरातीत बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटीही थिरकताना दिसत आहेत. अभिनेता रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, रजनीकांत, अर्जुन कपूर, जॉन सीना डान्स करताना पाहायला मिळाले.

दरम्यान, अनंत आणि राधिका यांचा आज शाही विवाहसोहळा असून उद्या अर्थात १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभासाठी मोजके पाहुणे उपस्थित राहतील. त्यानंतर १४ जुलैला रिसेप्शन सोहळा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT