Anant Ambani Tried Lifting Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Video: अनंत अंबानीने सलमान खानला उचलण्याचा केला प्रयत्न, पण पुढं घडलं असं की...

Anant Ambani Tried Lifting Salman Khan: सलमान खानने अनंत अंबानींसोबत एकॉनच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. अनंत अंबानी आणि सलमान खान यांचा एक मजेदार व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान आणि अनंतच्या विनोदी शैलीने सर्वांची मनं जिंकली.

Priya More

Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding:

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी आणि आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग (Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding) इव्हेंटमध्ये बॉलिवूडपासून ते हॉलिवूड स्टार्सची वेगळीच स्टाइल पाहायला मिळाली. या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनी जबरदस्त डान्स करत सर्वांचे मनोरंजन केले. अशामध्ये बॉलिवूडचा 'सुलताना' अर्थात सलमान खानने (Salman Khan) देखील या फंक्शनमध्ये खूप धम्माल केली. सध्या या फंक्शनमधील सलमान खानचा अनंत अंबानीसोबतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खानने अनंत अंबानींसोबत एकॉनच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. अनंत अंबानी आणि सलमान खान यांचा एक मजेदार व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान आणि अनंतच्या विनोदी शैलीने सर्वांची मनं जिंकली. या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनंत अंबानीने सलमान खानला उचलण्याचा प्रयत्न केला. प्री-वेडिंग फंक्शनमध्ये एकॉन गाणं गात होता. त्यावेळी स्टेजवर अनंत अंबानी आणि सलमान खान धम्माल करत होते. याचवेळी अनंत अंबानींचे उत्साहाच्या भरामध्ये सलमान भाई असं म्हणत सलमान खानला उचलण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याचा प्रयत्न फसला. सलमानला उचलण्यात अनंत अयशस्वी झाल्यानंतर दोघेही जोरजोरात हसू लागतात. त्यानंतर सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा स्टेजवर येतो आणि तो सलमानला उचलून घेतो. हे पाहून अनंत अंबानी खूप उत्साहित झाले.

सलमान खान आणि अनंत अंबानी यांच्यातील या मजेदार क्षणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. दोघांमधील बॉन्ड अप्रतिम दिसत आहे. शेरा जेव्हा सलमानला उचलतो तेव्हा जोरजोरात ढोल वाजू लागतात. यावेळी एकॉन देखील जोरजोरात गाणं गायला सुरूवात करतो. यावेळी अनंतसोबत सलमान खानने देखील भांगडा डान्स केला. सध्या सलमान आणि अनंत यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, या प्री-वेडिंग फंक्शनमधील बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे त्याने पुन्हा एकदा आपल्या रोमँटिक स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये किंग खान पत्नी गौरी खानसोबत रोमँटिक डान्स करताना दिसला. 'वीरा-झारा' या चित्रपटातील सुपरहिट गाणं 'मैं यहाँ हूं' या गाण्यावर दोघांनीही जबरदस्त डान्स केला. या फंक्शनच्या पहिल्या दिवशी पॉप संगर रिहानाने एनर्जेटिक परफॉर्मंन्स देत धुमाकूळ घआतला. दुसऱ्या दिवशी पंजाबी गायक दिलजीत दोसांझने आपल्या स्टाइलमध्ये मैफिल रंगवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार म्हणाला जय गुजरात, हा गद्दार रुकेगा नही साला - उद्धव ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT