Amruta Khanvilkar Lavani Saam tv
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: सातासमुद्रापार चंद्राच्या नृत्याविष्काराचा डंका; अमृता खानविलकरच्या लावणींची फॉरेनर्सना पडली भुरळ

Amruta Khanvilkar Lavani: फॅशन, अभिनय, नृत्य अश्या विविध पैलू मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर तिच्या अभिनयाचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत.

Shruti Vilas Kadam

Amruta Khanvilkar Lavani: फॅशन, अभिनय, नृत्य अश्या विविध पैलू मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर ! तिच्या अभिनयाचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत सध्या अमृता जगभरात प्रवास करताना देखील दिसतेय आणि नुकतीच ती USA टूर वर गेली आहे पण हा फक्त प्रवास नाही तर ही टूर तिच्या अगदी मना जवळची आहे आणि याच कारण देखील तितकच खास आहे.

अमृताच नृत्य कौशल्य अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांनी अनुभवलं आहे आणि आजही तिच्या अदाकारी परॉर्मन्सवर चाहते तितकेच खुश होताना बघायला मिळतंय. अगदी लावणी पासून क्लासिकल नृत्या पर्यंत अमृता ने कायम सगळ्यांना भारावून सोडलं आहे. " सुंदरी " हा सदाबहार नृत्यप्रयोग परफॉर्म करण्यासाठी अमृता या खास USA टूर वर आहे विशेष म्हणजे अमृताची देखील ही पहिली USA वारी आहे आणि या खास टूर मध्ये ती स्वतःच्या आवडीचा खास नृत्याविष्कार यात सादर करताना दिसते.

या बद्दल बोलताना अमृता सांगते " पहिल्यांदाच मी आणि आशिष पाटील अमेरिकेत " सुंदरी " सारखा विशेष नृत्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. आशिष च्या ( Nritya Aashish Sundari ) नृत्य आशिष सुंदरी चा हा पहिला वहिला परदेश दौरा आहे. लावणीचा ठसका आणि कत्थकची नजाकत यांचा आगळा वेगळा संगम यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय याचा आनंद तर आहे पण ही कला, स्त्रीत्व, आणि संस्कृतीची सुंदर गोष्ट आता परदेशात मराठी माणसांसाठी सादर होते आहे याचा खूप अभिमान देखील आहे. संस्कृतीची सीमारेषा ओलांडणारा हा सोहळा साता समुद्रापार घडतोय याहून वेगळं सुख काय असणार. मराठी प्रेक्षक परदेशात सुद्धा तितकच प्रेम देतात हे बघून भारावून जायला होतंय"

एका अर्थाने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परदेशात देखील तितकीच प्रेम मिळवते याचा सगळ्यांना अभिमान आहे यात शंका नाही. येणाऱ्या काळात अमृता अनेक नवनवीन गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला तर येणार आहे आणि प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Dhananjay Munde : मुंबईत कोट्यवधींचं घर; मुंडे मात्र 'सातपुडा'वर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT