Amruta Fadnavis Saam TV
मनोरंजन बातम्या

Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं; स्वतःही गाण्यावर थिरकल्या; VIDEO बघाच!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रीलीज झालं आहे.

Chetan Bodke

Amruta Fadnavis New Song Released: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रीलीज झालं आहे. Mood Banaleya असे या गाण्याचे बोल असून, सध्या ते सोशल मीडियावर तुफान हिट झालं आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडिओ साँगला जवळपास पावणेतीन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अमृता फडणवीस या बँकर असून, त्या गायिकाही आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली असून, त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या गाण्यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं आहे. आता त्यांचं नवं गाणं प्रदर्शित झाले आहे. ‘आज मैं मूड बणा ले या...’ असे या गाण्याचे बोल आहेत. अमृता यांनी या म्युझिक व्हिडिओमध्ये डान्सही केला आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

अमृता फडणवीस या बँकर असून, सामाजिक क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. त्यांना गायनाची आवड असून, याआधीही त्यांनी अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी आपल्या या नव्या म्यूझीक व्हिडिओ साँगचं पोस्टर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं होतं.

तर काल गुरुवारी त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ टीझर शेअर केला होता. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस या नृत्य करतानाही दिसल्या. त्यामुळे या गाण्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अमृता फडणवीसांचा लूक आणि त्यांनी केलेले नृत्य यामुळे या गाण्याच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Face Care: दररोज फेस पावडर लावण्याची सवय आहे, मग चेहऱ्याला होऊ शकतात 'हे' स्किन प्रॉब्लेम्स

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

SCROLL FOR NEXT