Amruta Fadnavis Saam TV
मनोरंजन बातम्या

Amruta Fadnavis Latest News: कॅमेरे अमृता फडणवीसांवर, पण चर्चा 'जग्गू दादाची'...

पुण्यात काल 'महाराष्ट्र किंग आणि क्विन स्पर्धा २०२३' या कार्यक्रमात अमृता फडणवीस आणि अभिनेता जॅकी श्रॉफ एकत्र होते.

Chetan Bodke

Amruta Fadnavis Latest News: पुण्यात काल 'महाराष्ट्र किंग आणि क्विन स्पर्धा २०२३' या कार्यक्रमात अमृता फडणवीस आणि अभिनेता जॅकी श्रॉफ एकत्र होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यमांचे कॅमेरे सरसावत होते, पण मागे वेगळंच काहीतरी सुरु होतं. मागे जॅकी श्रॉफ यांना पाहून लोकांनी सेल्फीसाठी गर्दी केली.

नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओत, एकीकडे समोर अमृता फडणवीस यांचा बाईट सुरु होता. तर दुसरीकडे मागे जग्गूदादासोबत अर्थात जॅकी श्रॉफ यांच्यासोबत चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी लोकांची लगबग पाहायला मिळाली.

जॅकी श्रॉफ यांच्या परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते डाऊन टू अर्थ होते, याची प्रचिती यावेळी चाहत्यांना ही पुन्हा एकदा आली. अमृता फडणवीस यांना डिस्टर्ब होणार नाही, याची काळजी घेत जग्गू दादाचं आपल्या चाहत्यांसोबत गुपचूप सेल्फीसेशन जोरात सुरु होतं.

सध्या अमृता फडणवीस कमालीच्या चर्चेत आहेत. त्यांचे नुकतेच गाणे सोशल मीडियवर प्रसिद्ध झाले असून त्या गाण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. नेहमीच अमृता फडणवीस माध्यमांवर चर्चेत असतात.

त्या आपल्या शैलीतील बोलण्याने माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. त्यांच्या गाण्यामुळे चाहत्यांच्या संख्येतही बरीच वाढ झाली आहे.अमृता फडणवीस यांचे ६ जानेवारीला नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. अमृता यांनी हे गाणे मराठी नाही तर पंजाबीमध्ये गायले आहे.

अमृता फडणवीसांचे 'मूड बणालेया' हे पंजाबी पार्टी सॉंग आहे. या गाण्यातील त्यांचे आऊटफिट कमाल आहे. त्यांच्या या गाण्याला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अमृता फडणवीस 'मूड बणालेया' या गाण्याला एका दिवसात १० मिलियन लोकांनी पहिले होते. अमृता यांचे हे पहिले गाणे नसून त्यांनी याआधी सुद्धा अनेक गाणी गायिली आहेत. त्यांच्या गाण्यांची नेहमीच चर्चा देखील झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार? केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच e-KYC पूर्ण

Friday Horoscope : नको त्या ठिकाणी खरे बोलणे टाळलेले बरे; ५ राशींच्या लोकांनी महत्वाची कामे पुढे ढकला अन्यथा...

कर्जमाफीवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली, ठाकरेंनी लावला फडणवीसांचा तो ऑडीओ

Maharashtra Live News Update: जयंत पाटलांकडून नगराध्यक्षाचा पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Manoj Jarange : हत्येचं षडयंत्र कुणी रचलं? मनोज जरांगेंनी केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT