Amruta Deshmukh Prasad Jawade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Deshmukh Prasad Jawade:'हळद लागली नवरदेवा, मुंडावळ्या डोई ग सजल्या', अमृता प्रसादची लगीनघाई

Amruta Deshmukh Prasad Jawade: अमृता प्रसादच्या लग्नसमारंभाला सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amruta Deshmukh-Prasad Jawade Wedding:

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नसमारंभाना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा मेहंदी समारंभ पार पडला आहे. मेहंदीनंतर आता हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अमृता देशमुख-प्रसाद जवादे दोघेही बिग बॉस ४ मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावरुन त्यांच्या नात्याची कबूली दिली. तर आता १८ नोव्हेंबरला हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.

अमृता प्रसादच्या लग्नसमारंभाला सुरुवात झाली आहे. अमृताच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमृता आणि प्रसाद डेस्टिनेशन वेडिंग प्लान केले आहे. त्याच ठिकाणी त्यांनी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

अमृताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर तिने सुंदर फ्लॉवर ज्वेलरी घातली आहे. तर प्रसादने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर फुलांची डिझाइन असलेले जॅकेट घातले आहे. अमृता प्रसादचा ड्रेस जवळपास सारखाच आहे. अमृता-प्रसादचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडिओत त्यांनी नाचत गाजत एन्ट्री घेतली आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत अमृताला रडू कोसळताना दिसत आहे.

अमृताच्या या लग्नाला अनेक कलाकार मंडळीनी हजेरी लावली आहे. फ्रेशर मालिकेतील सर्व सहकलाकार अमृताच्या लग्नाला उपस्थित आहेत. रश्मी अनपट, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ खिरीड, ओमकार राऊत, नम्रता संभेराव या कलाकरांनी हजेरी लावली आहे. कलाकारांनी अमृताच्या हळदीला डान्सदेखील केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT