Prasad Jawade- Amruta Deshmukh Chaha-Pohe Video Instagram
मनोरंजन बातम्या

Amruta Deshmukh Share Video: प्रसाद-अमृताचा हटके कांदे-पोहे कार्यक्रम, परंपराच बदलून टाकली; किचनमध्ये काय झालं?

Prasad - Amruta Romantic Video : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे आता त्यांचा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत.

Pooja Dange

Amruta Deshmukh - Prasad Jawade Relationship Update : बिग बॉस या कार्यक्रमाची खासियत आहे. प्रत्येक सीजनला या कार्यक्रमातून एक कपल प्रेक्षकांच्या भेटीला येत. अशीच जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. अमृता आणि प्रसाद 'बिग बॉस मराठी ४'मध्ये स्पर्धक होते.

अमृता आणि प्रसादने जुलै महिन्यात साखरपुड्याची घोषणा केली. त्याधी हे दोघे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होते. परंतु दोघेही इतक्या लवकर विवाहबंधनात अडकतील असे कोणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला.

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे आता त्यांचा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या बघण्याच्या कार्यक्रमाचा आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीलाच प्रसाद किचनमध्ये दिसत आहे. तर अमृता त्याला विचारत आहे, 'कसं वाटतंय तुला ? तू मला बघायला आला आहेस आणि तूच चहा बनवत आहेस' यावर हसत प्रसाद उत्तर देतो. (Latest Entertainment News)

प्रसाद म्हणतो की, 'मला कधीच असा टिपिकल चहा आणि पोह्यांचा कार्यक्रम करायचा नव्हता. कारण त्याच्या मागे दोन कारण आहेत. एकतर मला तुझ्या हाताचा चहा आवडत नाही आणि मला बरा चहा प्यायची ईच्छा होती. तरीही नेहमीप्रमाणे तू मला सांगितलं की कॉफी बनवून दे मला. सो आता काय कॉफी करतोय.' त्यावर अमृता त्याला म्हणते, तुझी कॉफी असते तितकी खास.'दोघेही खूप सुंदर बॉन्ड शेअर करतात हे व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत अमृता देशमुखने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जेव्हा प्रसाद जवादे आणि त्याची फॅमिली मला "बघायला" आले...! नंतर मी नाजूक हातांनी सगळ्यांना चहा सर्व्ह केला. जे काही किचनमध्ये घडलं ते किचनमध्येच राहील.

जोक्स अपार्ट, फक्त प्रसादच नाही तर त्याच्या फॅमिलीला देखील हा रिवर्स चहा-पोहे कार्यक्रम खूप आवडला! हा रिवर्स कार्यक्रमाची कल्पना सगळ्यांना पटो ही ईच्छा'

मेघा घाडगेने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले आहे की, 'मी तुम्हा दोघांसाठी खुप आनंदी आहे ..! असेच आयुष्यभर आनंदी रहा . खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.' तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील कमेंट केली आहे. प्रसाद आणि अमृता १८ नोव्हेंबर, २०२३ लग्न करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT