Amrita Fadnavis New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amrita Fadnavis: अमृता फडणवीसांचं नवं गाण आलं; काही तासांतच सोशल मीडियावर धुमाकूळ, ३० लाखांहून अधिक व्ह्यूज, काय म्हणाले नेटकरी?

Amrita Fadnavis New Song: अमृता फडणवीस यांचे नवे भक्तिगीत 'शंभू रे' प्रदर्शित झाले आहे. त्याचा संगीत व्हिडीओही रिलीज होताच अनेक कमेंट्स आल्या आहेत.

Shruti Vilas Kadam

Amrita Fadnavis New Song: गायिका आणि सामाजिक व्यक्तिमत्व अमृता फडणवीस यांचे नवे भक्तिगीत ‘शंभू रे’ (Shambhu Re) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाशिवरात्री निमित्त प्रदर्शित झालेलं हे भजन भगवान भगवान शिव यांना अर्पण केलेले असून मनाला शांती देणारे आहे.

‘शंभू रे’ हे गीत टी-सीरिजच्या बॅनरखाली रिलीज करण्यात आले असून संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मोंटी शर्मा यांनी केले आहे. या भजनाचे लेखन श्रीजन वैश्नव यांनी केले असून, त्यातील भावनिक लय आणि भक्तिपूर्ण शब्दांनी हे गाणं काही वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीसाठी प्रेक्षकांना प्रेरित करतं.

हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांने लिहिले, जबरदस्त डायरेक्शन. आणखी एकाने लिहिले, आसामी पारंपारिक पोशाखात शूटिंग केल्याबद्दल धन्यवाद. तर एकाने लिहिले, अमृता मॅडम, तुमच्या सर्व गाण्यांपैकी मला हे गाणे सर्वात जास्त आवडले.

हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांने लिहिले, जबरदस्त डायरेक्शन. आणखी एकाने लिहिले, आसामी पारंपारिक पोशाखात शूटिंग केल्याबद्दल धन्यवाद. तर एकाने लिहिले, अमृता मॅडम, तुमच्या सर्व गाण्यांपैकी मला हे गाणे सर्वात जास्त आवडले.

अमृता फडणवीस यांनी याआधीही अनेक सामाजिक आणि भक्तिमय संगीतात आपला आवाज दिला आहे. त्यांच्या आधीच्या गाण्यांमध्ये 'मुंबई रिव्हर अँथम', 'अलग मेरा ये रंग है' आणि 'तु मंदिर तु शिवाला' यांसारखी गीतं चर्चेत आली आहेत.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT