Amrish Puri Birth Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amrish Puri Birth Anniversary : काय सांगता... बॉलिवूडच्या खलनायकाने केली होती मराठी सिनेसृष्टीतून करियरची सुरूवात; चित्रपटही आहे गाजलेला

Amrish Puri 1st Film : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. त्यांना बॉलिवूडने विशेष ओळख दिली आहे. पण असं असलं तरीही त्यांनी आपल्या सिनेकरियरची सुरूवात मराठी चित्रपटांतून केली होती.

Chetan Bodke

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण ते त्यांच्या चित्ररपटातून कायमच चाहत्यांच्या मनात सदैव जिवंत आहेत. आज (२२ जून )अमरीश पुरी यांचा जन्मदिवस. २२ जून १९३२ रोजी जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाची मोहोर बॉलिवूड चित्रपटांतून उमटवली आहे, त्यांना जगभरात ओळख बॉलिवूड चित्रपटानेच दिली आहे. पण असं असलं तरीही त्यांनी आपल्या सिनेकरियरची सुरूवात मराठी चित्रपटांतून केली होती. जाणून घेऊया त्यांच्या सिनेकरियरबद्दल...

अमरीश पुरी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरहिट खलनायक होते. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कोणतीही भूमिका असो, तिला व्यवस्थित न्याय देण्याचे काम अमरीश पुरी करायचे. १९६७ साली रिलीज झालेल्या एका मराठी चित्रपटातून अमरीश पुरी यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरूवात केली होती. ‘शांतता कोर्ट चालू आहे’मध्ये अमरिश पुरी यांना पहिला रोल मिळाला होता. या चित्रपटात अमरीश पुरी यांनी रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. तर अमरीश पुरी यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी वयाच्या ३९ व्या वर्षी मिळाली होती.

अमरीश पुरी यांच्यावर घराची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी घर चालवण्यासाठी इंश्युरन्स कंपनीत नोकरी केली होती. नोकरी करताना त्यांनी थिएटरपासून करियरचा श्रीगणेशा केला होता. कालांतराने त्यांनी फुल्ल टाईम अभिनयात आपलं करियर केलं. अमरीश पुरी हे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक महागडे खलनायक होते. बॉलिवूडशिवाय हॉलिवूडमध्येही अमरीश पुरी यांनी आपला ठसा उमटवला. अमरीश यांनी स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा चित्रपट इंडियाना जोंसमध्ये मूला रामची भूमिका वठवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT