Amol kolhe Share Photo in Chhatrapati Shivaji Maharaj Look Facebook @Dr.Amol Kolhe
मनोरंजन बातम्या

Amol Kolhe Share Post: साक्षात महाराज दिसले... अमोल कोल्हे यांच्या फोटोवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Amol Kolhe post: डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Pooja Dange

Amol kolhe Share Photo in Chhatrapati Shivaji Maharaj Look: अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नेहमीच चर्चेत असतात. अमोल कोल्हे सोशल मीडियावर सक्रिय देखील आहेत. नुकताच त्यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला. तसेच या फोटो संबंधित आठवणी देखील सांगितल्या आहेत.

अमोल कोल्हे यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिलं आहे. तसेच त्यांनी छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका देखील साकारली आहे. त्यांच्या या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. (Latest Entertainment News)

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो रायगडावरील असून अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी हा जुना फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'कुणी केव्हा फोटो काढला ठाऊक नाही..

पण कृतकृत्यतेची भावना निर्माण करणारा हा क्षण टिपणाऱ्या अज्ञात छायाचित्रकाराचे अन तो जपून ठेवणाऱ्या व्यक्तीचे मनःपूर्वक धन्यवाद!' तसेच त्यांनी या फोटोसाठी शिवभक्त महेश पितांबरे यांना सौजन्य दिले आहे.

अमोल कोल्हे यांच्या या फोटो अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी कमेंट करून अमोल कोल्हे यांचे कौतुक करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिलं आहे, पाहिल्या क्षणाला महाराज असण्याचा भास झाला.

तर दुसऱ्याने लिहिले आहे, या फोटोपेक्षा असे वाटतेय कुणी १७ व्या शतकात छत्रपतींचे चित्र रेखाटले आहे. पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसापर्यंत नुसते शहारे हृदयाचा ठोका चुकवणारा हा फोटो आहे..... जय शिवराय... तर आणखी एकाने लिहिले आहे साक्षात महाराज दिसले.

सध्या अमोल कोल्हे राजकारणात आणि संजकर्णात सक्रिय आहेत. त्याचसह त्यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य घेऊन ते आपल्या भेटीला येत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT