Shivpratap Garudjhep Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Film 'Shivpratap Garudjhep': ‘शिवप्रताप गरुडझेप’ला जयंत पाटलांची हजेरी: म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट चित्रपट...

दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही दर्शवली चित्रपटाला पसंती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. परंतु अमोल कोल्हे जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारतात तेव्हा प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट (Movie) प्रदर्शित झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही चित्रपटला पाहिला असल्याचे सांगितले आहे.

या चित्रपटातही डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असलेला व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामच्या (Social Media) माध्यमातून शेअर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील हा चित्रपट पाहिला असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका आणि त्यादरम्यानचा थरार या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्सुक होते. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. मराठी भाषिक प्रेक्षकांबरोबर अमराठी प्रेक्षकही हा चित्रपट आवडीने पाहत आहेत असे अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील हा चित्रपट पाहिल्याचे सांगितले आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपट कसा वाटला? असे विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मला खात्री आहे की महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचाही समावेश होईल.” जयंत पाटील यांना हा चित्रपट आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येते.

‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटामध्ये अमोल यांच्यासह यतीन कार्येकर, मनवा नाईक, प्रतीक्षा लोणकर, पल्लवी वैद्य, हरीश दुधाडे कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहते. यतिन कार्येकर या चित्रपटात अफजल खानाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' मध्ये भाऊ कदम का नाही?

Maharashtra Live News Update : शिवसेना-मनसेचे खासदार दुबे आणि आमदार गायकवाड यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन

Accident News : मोठी बातमी! आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Mira Bhayandar Protest : मीरा रोडचा हिंदी भाषिकांचा मोर्चा योग्य, पण मनसेचा मोर्चा....; अबू आझमींचा मनसेवर हल्लाबोल, VIDEO

Shocking : आईला भूतबाधा झाली म्हणून मांत्रिकाला घरी बोलावले, तरुणाने मांत्रिकासह जन्मदात्या आईला केली मारहाण; महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT