Amitabh Bachchans movie Goodbye is coming soon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Good Bye Release Date : अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र'नंतर करणार 'गुडबाय';श्रीवल्लीसोबत...

बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन आता नव्या प्रोजेक्टसाठी काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा 'गुडबाय' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कारणही तसंच आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र'(brahmastra) सिनेमातही अमिताभ महत्वाच्या भूमिकेत आहेत. आता ते नव्या प्रोजेक्टसाठी काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा 'गुडबाय'(Goodbye) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पोस्टर रीलीज झाला आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये कोणत्या तारखेला झळकणार हे सुद्धा जाहीर झालं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'गुडबाय' या सिनेमाची रीलीज डेट समोर आली आहे. निर्मात्यांनी सिनेमाचे पोस्टर रीलीज करून सिनेमातील सर्व कलाकारांची ओळख करून दिली आहे आणि त्याची रीलीज डेट देखील जाहीर केली आहे. सिनेमाच्या नवीन पोस्टरनुसार हा सिनेमा ७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महत्वाचं म्हणजे, या सिनेमात बिग बी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहेत. या दोघांशिवाय नीना गुप्ता, एली अवराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता हे देखील सिनेमात आहेत.

या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ आणि रश्मिका मंदान्ना स्वेटशर्ट घातलेले, सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. निळ्या रंगाच्या हुडीमध्ये अमिताभ बच्चन रश्मिकाच्या हातातून पॉपकॉर्न घेताना दिसत आहेत. याशिवाय पांढऱ्या सलवारमध्ये जमिनीवर बसलेल्या नीना गुप्ता हसताना दिसत आहेत. सोफ्याच्या मागे भिंतीवर अनेक फोटो फ्रेम्स आहेत. याशिवाय इतर कलाकार नीनासोबत जमिनीवर बसलेले आहेत.

'गुडबाय' हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा आहे. यात कुटुंब आणि नातेसंबंधांची हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात आली आहे. विकास बहल दिग्दर्शित हा सिनेमा बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT