Amitabh Bachchan play PM Narendra Modi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan play PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनणार बायोपिक; महानायक अमिताभ बच्चन साकारणार भूमिका ?

PM Narendra Modi Biopic : बिग बी अमिताभ बच्चन लवकरच नरेंद्र मोदीच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amitabh Bachchan plays PM Narendra Modi In Biopic : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) गेल्या ४० दशकांपासून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.प्रेक्षक नेहमीच अमिताभ बच्चन यांचे कौतुक करत असतात.अमिताभ बच्चन नेहमीच चर्चेत असतात.नुकतच बिग बी अमिताभ बच्चन लवकरच नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा होत आहे.

नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या आयुष्यावर २०१९ साली चित्रपट प्रदर्शित झाला होता.या चित्रपटात मोंदीचा बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटात विवेक ऑबोरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली होती.आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर बायोपिक येण्याची चर्चा होत आहे. (Latest Entertainment News)

'टॉयलेट एक प्रेम कथा' आणि 'परी' या चित्रपटाच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या नरेंद्र मोदींवर चित्रपट करण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा होत आहे.

झूमनं दिलेल्या वृत्तानुसार, प्रेरणाला नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकबद्दल विचारण्यात आले. 'नरेंद्र मोदी ही भारतातील सर्वात 'शक्तिशाली आणि सक्षम' व्यक्ती आहेत. कलाकार म्हणून नरेंद्र मोदींच व्यक्तिमत्तव मला प्रभावित करतं.

म्हणूनच त्यांच्या आयुष्यावर चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे. या चित्रपटासाठी नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन योग्य आहेत असा माझा विश्वास आहे'.असे प्रेरणा यांनी सांगितले.

चित्रपटाबद्दल बोलताना प्रेरणा म्हणाली, 'हा चित्रपट नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील विविध पैलूंवर हा चित्रपट असेल.चित्रपटात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा प्रवास असेल. पंतप्रधान झाल्यानंतर परराष्ट्र धोरण स्वीकारण्यापासून ते कोरोना काळातील परिस्थिती यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल'.

बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के'(Project K) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटही अमिताभ बच्चन यांचा लूक समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT