Amitabh Bachchan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही पावसाचा फटका; घरात साचले पाणी, VIDEO व्हायरल

Amitabh Bachchan Jalsa Bungalow Video : मुंबईतील मुसळधार पावसामुळे बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यात पाणी शिरले आहे. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यातही पाणी शिरले.

मुसळधार पावसाचा बॉलिवूडलाही फटका

गेले काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. धो धो पडणाऱ्या पावसाळामुळे अनेक भागांतील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली. पावसामुळे सर्व सामान्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले, रेल्वे सेवा विस्कळीत झाली. तर नदी- नाले वाहू लागले आहे. पावसाचा फटका बॉलिवूडलाही चांगलाच बसला आहे.

मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'जलसा' बंगल्यातही पाणी शिरले आहे. याचे फोटो आमि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, 'जलसा' बंगल्याच्या परिसरात पाणी साचल्याचे दिसत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे 'जलसा' बंगला जलमय आणि आसपासचा भाग जलमय झाला आहे.

'जलसा' बंगल्याच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे रुळावरही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक ठिकाणी, जागोजागी पाणी साचले आहे.

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन लवकरच 'कल्की २८९८ एडी' च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. यानंतर ते रिभू दासगुप्ता दिग्दर्शित 'सेक्शन ८४' या कोर्टरूम ड्रामाही येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. अलिकडेच त्यांनी 'कौन बनेगा करोडपती'चा १७ वा सीझन पूर्ण केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT