Amey Khopkar Warns Film Producer's: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या भारतात तुफान चर्चा सुरू आहे. आपल्या प्रियकराकरिता ती तिच्या ४ मुलांसोबत भारतात आली आहे.
पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरचं आणि भारतात राहणाऱ्या सचिन मीणाचं PUBG गेममुळे सुत जुळलं. लवकरच या कपलची लव्हस्टोरी प्रेक्षकांना ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
पण सीमाचीही लव्हस्टोरी रूपेरी पडद्यावर झळकणार ही बाब मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना पटलेली दिसत नाही. सीमा हैदरच्या बॉलिवूड डेब्यूवर मनसेचे सरचिटणीस आणि मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाष्य केलं आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणतात, “पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!! ” अशी पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष, अमेय खोपकर यांनी केले आहे.
सीमा- सचिनच्या या लव्हस्टोरीवर ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाची निर्मिती जानी फायरफॉक्स करत असून आगामी वर्षात सीमा- सचिनचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यानचा एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. त्या व्हायरल व्हिडीओत, दोन कलाकार कॅमेऱ्यासमोर ऑडिशन देताना दिसत होते.
मध्यंतरी सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री होणार असल्याची बरीच चर्चा सुरू होती. सीमा हैदर २०२४ ची खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा सुरू होती. सीमाला एनडीएचा मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून ऑफर मिळाली होती. पण नंतर ती माहिती खोटी असल्याची खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वत: स्पष्ट केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.