Like And Subscribe Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Like And Subscribe Movie:पाऊस, मातीचा सुगंध अन् गणरायाचं स्वागत; शुभंकरने सांगितला कोकणातल्या गणेशोत्सवाचा खास अनुभव

Amey Wagh And Shubhankar Tawde: 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपटाच्या निमित्ताने अमेय आणि शुभंकरने गणेशोत्सवातील त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Manasvi Choudhary

अभिनेता अमेय वाघ आणि शुभंकर तावडे यांचा आगामी 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी गणपती बाप्पााच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. नुकतेच 'लाईक आणि सबसक्राईब' चित्रपटाच्या टिमने साम- सकाळ कार्यालयातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपटाच्या निमित्ताने अमेय आणि शुभंकरने उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी मुलाखतीत अमेय वाघ आणि शुंभकर तावडेने गणेशोत्सवातील त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अमेय वाघ म्हणाला, पूर्वी गणेशोत्सव हा सण एकत्रित कौटुंबिक पद्धतीने साजरा व्हायचा. आताचे स्वरूप बदलले आहे. गावी पूर्वी सर्वाचा मिळून एकच गणपती असायचा. त्या आठवणी जास्त आहेत. २० वर्षापूर्वी आम्ही वेगळे झालो. आता प्रत्येकाकडे गणपतीचे आगमन होते.

पुढे त्याने, गणेशोत्सव हा एकच असा सण आहे. ज्यामध्ये लोक सर्व दु:ख विसरून आनंदाने साजरा करतात. या सणाला जात, धर्म मतभेद न बाळगता हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेशोत्सवाचे हे दहा दिवस अत्यंत आनंदाचे असतात.

अभिनेता शुभंकर तावडे मूळचा कोकणातला असल्याने गणपतीला गावी जाण्याची वेगळीच ओढ असायची. गावी गणपतीत नेहमी जायचो. पावसाचे दिवस असल्याने गावी गेल्यानंतर मातीचा सुगंध आणि गणरायाचं स्वागत हे समीकरणच वेगळं असायचं. भजनासाठी किंवा आरतीसाठी सर्व लोक गोळा व्हायचे. ३० ते ३५ घरांमध्ये आरतीसाठी व्हायची. पिशवी भरून प्रसाद आणायचा अशी ती मज्जा काहीशी वेगळीच होती.

अमेय आणि शुभंकर यांचा 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर, जुई भागवत, विठ्ठल काळे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबरला 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT