Mirzapur Season 3 Instagram
मनोरंजन बातम्या

Mirzapur 3 Series Story Reveal: भौकाल ! ‘मिर्झापूर ३’ चाहत्यांची झोप उडवणार; रिलीज आधी कथानक आलं समोर

Mirzapur 3 Series Story: ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरीजच्या शेवटचा सीझनने चाहत्यांना कथेच्या मध्यभागी सोडले आणि त्यांना आश्चर्यचकित केले आहे. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

Chetan Bodke

Mirzapur 3 Series Story Reveal

‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरीजची कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चा होत असते. गुन्हेगारी विश्वावर बेतलेल्या या वेबसीरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून आता प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेवटचा सीझनने चाहत्यांना कथेच्या मध्यभागी सोडले आणि त्यांना आश्चर्यचकित केले असल्याने या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं दिसत आहे. (OTT)

गेल्या काही दिवसांपूर्वीच मिर्झापूरच्या तिसऱ्या भागाची शूटिंग पूर्ण झाली आहे. ‘मिर्झापूर’च्या आगामी सीझनमध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार ?, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कालीन भैय्या त्यांच्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार की गुड्डू भैय्या हाच ‘मिर्झापूर’चा राजा कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहे. याबद्दल प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन मार्च २०२४ मध्ये OTT वर रिलीज होणार आहे. (Web Series)

याआधीही मालिकेच्या कथेबाबत काही मोठे खुलासे झाले आहेत. रिपोर्टनुसार, सीझन ३ मध्ये प्रेक्षकांना एक वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. मिर्झापूर ३च्या कथेत त्रिपाठी आणि पंडित कुटुंबातील भांडणातून एक नवी स्टोरी मिळणार आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारे कथानक पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. टीव्ही ९ भारतवर्षच्या वृत्तानुसार, 'मिर्झापूर ३' मध्ये शेवटच्या भागात कालिन भैय्याने शरदच्या तावडीतून वाचवलेल्या मुलामध्ये आणि गुड्डूमध्ये वाद होणार असल्याचे सांगितले, जात आहे. (Bollywood)

टीव्ही ९ भारतवर्षने दिलेल्या माहितीनुसार, गोलू आपल्या कुटुंबीयांचा बदला घेताना दिसणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये, प्रेक्षकांना अनेक जुने कॅरेक्टर्सही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. वेबसीरीजच्या शेवटी असलेल्या कथानकात गुड्डू भैया तुरुंगातही जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी संपूर्ण मिर्झापूरवर गोलू राणी म्हणून राज्य करताना दिसणार आहे. नेमकं ‘मिर्झापूर’चा राजा कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनमध्येच मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोण कसा प्रयत्न करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Bollywood Film)

या वेबसीरिजचे चाहते बरेच असले तरी, तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची याचिका मध्यंतरी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायलयाने तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या वेबसीरिजमधील चित्रित दृश्य, भाषा यामुळे तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मिर्झापूर येथील एका रहिवाश्यानेच ही याचिका दाखल केल्याचं स्पष्ट झालं होतं. पंकज त्रिपाठी, अली फझल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसारख्या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT