Pushpa 2 Teaser Out
Pushpa 2 Teaser Out saam tv
मनोरंजन बातम्या

Where Is Pushpa? : पुष्पा कुठे गेला? अखेर उत्तर मिळालं... बघाच

Chetan Bodke

Pushpa 2 Teaser Out: अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना ही जोडी प्रमुख भूमिकेत असलेले ‘पुष्पा’ची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ कायम आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी नुकतीच निर्मात्यांनी गुड न्यूज दिली आहे.

निर्मात्यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक टीझर शेअर करत, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ निर्माण केली आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये प्रत्येकजण पुष्पाला शोधताना दिसत आहे. ‘पुष्पा कुठेय ?’ या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच येत्या ७ एप्रिलला मिळणार आहे.

निर्मात्यांनी सोशल मीडियावर हिंदीसोबत अनेक भाषांमध्ये टीझर शेअर केला आहे. टीझरची सुरुवात अंधारात बाईक चालवणाऱ्या एका व्यक्तीने होते आणि म्हणतो, "गोळ्यांनी जखमी झालेला पुष्पा तिरुपती तुरुंगातून पळून गेली." यानंतर पोलिसांचा आणि प्रचंड बंदोबस्त असताना देखील जमावाचा राडा झाला. अनेक जण पोलिसांच्या विरोधात घोषणा देत आहेत. तेव्हा एका महिलेने प्रश्न विचारला की ‘पुष्पा कुठेय ?’

निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर शेअर करताना, 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता ‘पुष्पा कुठेय ?’ याचा खुलासा केला जाईल, असे म्हटले आहे. पुष्पाचा शोध लवकरच पूर्ण होईल, असेही यात म्हटले आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचा पहिला टीझर ७ एप्रिललाच प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा’ चित्रपटाने छप्पर फाडके कमाई करत सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे एकूण 350 कोटींहून अधिकचं कलेक्शन केले होते. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या सोबत नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Man Killed girlfriend : प्रेमाचा भयंकर शेवट! मनालीला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबला

Today's Marathi News Live :झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोर्टाचा दिलासा नाहीच

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT