allu arjun vijay devarakonda Google
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : साउथ सिनेकलाकारांचा अल्लू अर्जुनला पाठिंबा, विजय देवरकोंडासह 'या' कलाकारांनी घेतली भेट...

Allu Arjun : अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटल्यानंतर अनेक स्टार्स त्याला भेटायला आले होते. दक्षिणेतील स्टार्सचा त्याला पाठिंबा मिळत आहे. विजय देवराकोंडाने घेतली अल्लू अर्जुनची बाजू. त्याचबरोबर अनेक कलाकार येऊन अल्लू अर्जुनला भेटून गेले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुनची संध्या थिएटर प्रकरणी शनिवारी सकाळी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. शुक्रवारीच त्याला जामीन मिळाला होता, तरी त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. त्याच्या सुटकेनंतर, अल्लू अर्जुनने त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आणि सांगितले की तो तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. त्याचबरोबर या कठीण काळात साऊथ सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील त्याला पाठिंबा देत आहेत.

अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर येताच त्याच्या घरी साऊथ सिनेसृष्टीतील कलाकार त्याला भेटण्यासाठी येण्यास सुरुवात झाली.अभिनेता विजय देवराकोंडाने त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली व भावुक होत त्याला मिठी मारली. जेव्हा पत्रकारांनी विजयला विचारले की तो अल्लू अर्जुनसोबत आहे का, तेव्हा तो, उत्तर देत १०० टक्के असे म्हणाला.

हे कलाकारही भेटले अल्लू अर्जुनला

अभिनेता राणा दग्गुबतीनेही अल्लू अर्जुनाची भेट घेतली. तो अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ उभा असल्याचेही दिसले. राणाही त्याला भेटण्यासाठी अल्लूच्या घरी पोहोचला. याशिवाय सुपरस्टार चिरंजीवीची पत्नी सुरेखाही त्याला भेटायला आली होती. तसेच पुष्पा २ चे दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता नागा चैतन्यही अल्लू अर्जुनाची भेट घेतली. तसेच अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर इमोशनल व्हिडिओ शेअर करत लिहिले, "मी रडत नाहीये, ठीक असे लिहून पाठिंबा दर्शवला.

४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २' च्या प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच घटनेबाबत पोलिसांनी अल्लू अर्जुनवर कारवाई करत १३ डिसेंबरला अटक केली. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र उच्च न्यायालयाकडून त्याला अंतरिम जामीन मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT