21 महिन्यांनी अलिबागकर सिनेमागृहात; ब्रह्मा-विष्णू-महेश थिएटरमध्ये पहिला शो सुरू 
मनोरंजन बातम्या

21 महिन्यांनी अलिबागकर सिनेमागृहात; ब्रह्मा-विष्णू-महेश थिएटरमध्ये पहिला शो सुरू

शुक्रवार पासून 21 महिन्यांनी अलिबागमधील सिनेमागृह प्रेक्षकांसाठी सुरू झाले आहे. सुर्यवंशी या चित्रपटाने शुभारंभ केला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले. त्यामुळे सर्व व्यवहार, पर्यटन स्थळे खुली झाली. राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असताना अलिबागमधील ब्रह्मा-विष्णू-महेश चित्रपटगृह अद्याप सुरू झाले नव्हते. मात्र शुक्रवार पासून 21 महिन्यांनी अलिबागमधील सिनेमागृह प्रेक्षकांसाठी सुरू झाले आहे. तब्बल 21महिन्यांनी सुर्यवंशी या चित्रपटाने शुभारंभ केला जात असून प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे. (Alibagkar to go to cinemas after 21 months, first show starts at Brahma-Vishnu-Mahesh Theater)

हे देखील पहा -

सिनेमागृह 50 टक्के उपस्थितीत सुरू करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नसले तरी अलिबागकरांच्या मनोरंजनासाठी नियमांचे पालन करून हे पाऊल उचलण्याचे धाडस सत्यजित दळी यांनी उचलले आहे. सिनेमागृह पुन्हा सुरू झाल्याने प्रेक्षकांची पावले आता सिनेमा पाहण्यास वळू लागली आहेत.

रायगड जिल्ह्यात आधीच चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे 1980 च्या आसपास भरभराटीस आलेला हा व्यवयास आजच्या घडीला पूर्णपणे बंद होईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कोरोना संकटामुळे या व्यवसायला घरघर लागली होती. मात्र दीड वर्षानंतर कोरोना आटोक्यात आल्यानंतर चित्रपटगृहे 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे शहरातील चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टीप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे मालक समाधान व्यक्त करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, मुरुड, सुधागड, उरण, माथेरान या आठ ठिकाणी सिनेमागृहेच नाहीत, तर काही ठिकाणचे सिनेमागृह बंद पडले आहेत. ही परिस्थिती कोरोनापूर्वीची होती. कोरोना कालावधीत आर्थिक घडी विस्कटल्याने पुन्हा थिएटर उघडण्यास सर्व दृष्टीने विचार करु लागले आहेत. अलिबाग येथील सुप्रसिद्ध ब्रह्म विष्णू महेश सिनेमागृहात पूर्ण सॅनिटायझर करण्यात आले आहे. सिनेमा पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांची तापमान तपासणी केली जात असून लस घेतलेल्यानाच प्रवेश दिला जात आहे. एक सीट सोडून प्रेक्षकांना सुरक्षित अंतराचा नियम ही पाळला गेला आहे. अलिबागमधील सिनेमागृह सुरू झाल्याने मोठया पडद्यावर सिनेमा पाहण्याचा आनंद अलिबागकर लूटणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT