Brahmastra  Instagram @aliaabhatt
मनोरंजन बातम्या

Brahmastra On OTT Release Date: रणबीर-आलियाचा ब्रह्मास्त्र OTTवर येणार नाही, जाणून घ्या काय आहेत कारणं?

बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागणाऱ्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ब्रह्मास्त्र हा चित्रपट (Movie) सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर बरीच टीका करण्यात आली होती. तरीही या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आलिया आणि रणबीर कपूर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि त्याचाच परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शन झाल्याचे दिसले.

बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्र हा चित्रपट जरी हिट ठरला असला तरी या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social Media) होत आहे. सुरूवातीला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असे बोलले जात होते. परंतु आता मात्र हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

ओटीटी नियमांनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ६० दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिनाच झालेला असला तरी दिवाळी दरम्यान हा चित्रपट ओटीटीवर येणार असे सांगितले जात होते. २३ ऑक्टोबरला हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चित्रपटाशी संबंधित व्यक्ती किंवा ओटीटीकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. ज्यांना ज्यांना हा चित्रपट चित्रपगृहांमध्ये पाहता आलेला नाही ते प्रेक्षक ओटीटीवर चित्रपट पाहणायसाठी उत्सुक आहेत. आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यासह अमिताभ बच्चन, शाहरुख खान, मौनी रॉय हे भूमिकेत होते. अयान मुखर्जी याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अयान या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT