Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt: आलिया भटचा बॉलिवूडमध्ये जबरदस्त 'इम्पॅक्ट'; टाइम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड्सने केले सन्मानित

अवॉर्ड मिळाल्यानंतर आलियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री आलिया भट तिच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सध्या तिच्या प्रेगन्सीची सुद्धा बरीच चर्चा होत आहे. आलिया या अवस्थेतही प्रोमोशन आणि इव्हेंट्सना जात असते. आलिया नुकतीच सिंगापूर येथील टाइम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड्स या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. या कार्यक्रमात आलियाला 'टाइम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. (Alia Bhatt News)

अभिनय क्षेत्रातील तिच्या कामगिरीबद्दल आलियाला अवॉर्ड देण्यात आला आहे. टाइम इम्पॅक्ट १०० हा अवॉर्ड त्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. आलियाने 'हायवे', 'गंगुबाई काठियावाडी', 'राझी', 'डार्लिंग्स' असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्रत्येक चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

टाइम १०० इम्पॅक्ट या कार्यक्रमासाठी आलिया गोल्डन रंगाचा शिमरी गाऊन घातला होता. त्या गाऊनमधे ती सुंदर दिसत होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. आलिया म्हणाली, 'मला खूप अभिमान वाटतोय की, मी येथे माझा देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. असा देश ज्याने मला आणि माझ्या करियरला पाठिंबा दिला. भारत हा असा देश ज्याचे मूळ मूल्यच विविधतेत एकता आहे. जसं शक्य होईल तसं मी माझं काम करीत राहीन. या अवॉर्डने माझा आणि माझ्या बाळाच्या जीवनावर 'इम्पॅक्ट' केला आहे'. आलियाने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांबरोबर हे क्षण शेअर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

YouTube Ban: 'या' देशात १६ वर्षांखालील मुलांवर यूट्यूब बंदी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: - प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार

Ind vs Eng 5th Test : बुमराह, पंत आणि शार्दुल बाहेर; पाचव्या कसोटीत कुणाला मिळाली संधी, अशी आहे भारताची प्लेईंग ११

Malegaon Blast Case : दहशतवाद कधीच भगवा नव्हता; मालेगाव बॉम्बस्फोट मुख्यमंत्र्यांसहित कोण काय म्हणालं?

sakhee Gokhale: अभिनेत्री सखी गोखलेबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT