Alia Bhatt Spoke About Daughter's Career  Instagram/@aliaabhatt
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Spoke About Daughter: तिने बॉलिवूडमध्ये येऊ नये तर... आलियाने स्वतःच निवडलं मुलगी 'राहा'चं करियर

Alia Bhatt During Film Promotion : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Pooja Dange

Alia Bhatt Told Raha Become Scientist : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गली बॉय चित्रपटातील तिचा को-स्टार रणवीर सिंगसोबत ती या चित्रपटामध्ये दिसणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

आज आलिया आणि रणवीर, करणसोबत मुंबईत एका कार्यक्रमात त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. चाहत्यांशी संवाद साधताना आलिया तिची मुलगी राहाविषयी देखील बोलत होती.

आलियाने एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केले आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. तेव्हापासून ते पालकत्वाच उपभोगत आहेत. रणबीर आणि आलिया अनेकदा त्यांच्या मुलीविषयी बोलताना दिसतात. (Latest Entertainment News)

आज देखील आलिया राहाविषयी बोलत होती. आलियाने मुलीविषयी खूप मोठी गोष्ट सांगितली. आलियाने सांगितले की राहा मोठी होऊन शास्त्रज्ञ होईल. आलिया म्हणाली, "जेव्हा मी माझ्या मुलीकडे बघते आणि तेव्हा म्हणते 'तू तो सायंटिस्ट बनेगी.' मुलीने आपल्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये यावे असे आलियाला वाटत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. एका चाहत्याने कमेंट केली, "ती वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे." आणखी एका चाहत्याने कमेंट केली, "रणबीर कपूर के बेटी है अभिनेता बोहोत अच्छा बनेगी." एकाने कमेंटमध्ये "क्यूट" असेही लिहिले आहे. तर अनेकांनी रेड हार्ट आणि हसतानाचा इमोजी शेअर केला आहे.

या कार्यक्रमात आलिया तिच्या शाळेचे दिवस आठवताना दिसली. आलियाने सांगितले की, ती तिच्या मैत्रिणींसोबत पाणी पिण्याच्या निमित्ताने फिरत बसायचो आणि लेक्टर बँक करून हँग आउट करायचो.

दरम्यान, रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात अनन्या पांडे, जान्हवी कपूर, वरुण धवन आणि सारा अली खान यांच्याही विशेष भूमिका असणार आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT